Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : Soybean Market: सोयाबीन उत्पादन वाढल्याची बाजारात चर्चा; बाजारभाव हमीभावापेक्षा कमी

Oilseed Rate : खरिपातील पिके बाजारात दाखल होऊन एक महिना झाला. बाजारातील सध्याचे भाव पाहता यंदा सोयाबीन, भुईमूग, ज्वारी आणि कारळ्याचे उत्पादन अधिक असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

अनिल जाधव

Pune News : खरिपातील पिके बाजारात दाखल होऊन एक महिना झाला. बाजारातील सध्याचे भाव पाहता यंदा सोयाबीन, भुईमूग, ज्वारी आणि कारळ्याचे उत्पादन अधिक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तूर, उडीद, मूग, सूर्यफूल आणि तीळाचे उत्पादन कमी तर भात, मका, बाजरी आणि रागीचे उत्पादन गेल्यावर्षीऐवढे राहील, असा अंदाज लावला जात आहे.

सरकारने अजूनही आपला खरिपातील उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला नाही. ऑक्टोबर महिन्यात खरिपातील उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला जाईल, असे सरकारने सप्टेंबर महिन्यात जाहीर केले होते. मात्र अद्यापही हा अंदाज आलेला नाही.

विशेष म्हणजे सरकारने मागील महीना दीड महिन्यात शेतकरी संघटना, विविध व्यापारी आणि उद्योगांच्या संघटनांसोबत बैठका घेऊन अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. या संघटना स्थानिक पातळीवर निरक्षणे करून नोंदी ठेवत असतात, असे सरकारचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे यंदा देशात कापसाची लागवड गेल्यावर्षीपेक्षा तब्बल ११ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे उत्पादनाचे अंदाजही कमी आहेत. गेल्या हंगामात देशात ३२५ लाख गाठी उत्पादन झाले होते. उद्योगांच्या अंदाजानुसार यंदा देशात ३०२ लाख गाठींचेच उत्पादन होणार आहे.

तरीही कापसाच्या भावात मोठी तेजी आली नाही. कापसाचे भाव आजही हमीभावापेक्षा कमी आहेत. कापसाचे भाव कमी असण्याला ओलावा हे एक कारण दिले जात असले तरी आता कापसातील ओलावा बहुतांशी भागात कमी झाला आहे.

केंद्र सरकारने क्रिसिल रिसर्च, अॅग्रीवाॅच, इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशन, इंडियन ऑईलसिड्स अॅन्ड प्रोडूस एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सील, इंडियन शुगर मिल्स असिसिएशन, काॅटन काॅर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आयसीएआरच्या इतर संस्थांची बैठक घेऊन खरिपातील उत्पादनाविषयी चर्चा केली.

व्यापारी आणि प्रक्रियादार आपल्या पातळीवर उत्पादनाचे अंदाज घेत असतात. उत्पादन यंदा वाढणार की घटणार याची कानोसा घेऊनच व्यापार केला जातो. व्यापारी आणि उद्योग नेहमीच सरकारच्या पुढे राहून पेरणीपासून निरक्षणे घेत असतात. शेवटी उत्पादन किती राहील? याचा अंदाज बांधूनच व्यापार केला जातो. विशेषतः कडधान्य, धान्य, तेलबिया या पिकांमध्ये उद्योग बारकाईने लक्ष ठेऊन असतात, असे काही व्यापारी आणि उद्योगांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT