Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Telangana Soybean MSP Procurement : केंद्राकडे आणखी सोयाबीन खरेदीची तेलंगणा सरकारडून मागणी; खरेदीचे उद्दीष्ट यापुर्वीच केले पूर्ण

Soybean Market : सोयाबीनचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त सोयाबीन खरेदीचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. तेलंगणाने ५९ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण केले.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीनचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त सोयाबीन खरेदीचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. तेलंगणाने ५९ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण केले. आणखी २५ हजार टन खरेदीची परवानगी कृषिमंत्री तुम्माला नागेश्वरा राव यांनी केंद्राकडे केली. तसेच त्यांनी मार्कफेडला खरेदीच्या सूचनाही दिल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र उद्दीष्टाच्या १५ टक्केही खरेदी झालेली नाही. 

तेलंगणात सोयाबीनचे उत्पादन कमी होते. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीन खेरदीचे सर्वाधिक उद्दीष्ट देण्यात आले आले. महाराष्ट्रात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट आहे. तर मध्य प्रेदशात १३ लाख ६८ हजार टनांचे उद्दीष्ट आहे. मात्र या यापैकी महाराष्ट्रात आतापर्यंत उद्दीष्टाच्या केवळ १४ टक्के खरेदी झाली. तर मध्य प्रदेशातील खरेदी २० टक्क्यांची पातळीही गाठू शकली नाही.

तेलंगणा सरकारने मात्र खरेदी परवानगी केंद्र सरकारने दिल्यानंतर लगेच खरेदीची प्रक्रिया सुरु केली. खरेदी केंद्रांना तातडीने परवानगी देत अडचणी सोडवल्या. त्यामुळे उद्दीष्टाचा विचार करता तेलंगणा सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीत आघाडीवर होता. केंद्र सरकारने यंदा तेलंगणात ५९ हजार ५०८ टन खेरदीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ते उद्दीष्ट तेलंगणा सरकारने तीन दिवसांपूर्वीच पूर्ण केले. तेलंगणाने सर्वात आधी सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट १०० टक्के पूर्ण केले.

केंद्राने दिलेले उद्दीष्ट पूर्ण झाले तरीही राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने खेरदी सुरु ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतरही तेलंगणा सरकारने लगेच केंद्राकडे तशी मागणी केली. तेलंगणा सरकारने केंद्राकडे पुन्हा २५ हजार टन खरेदीची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. मात्र तेलंगणा सरकारकडून त्याविषयी पाठपुरावा सुरु आहे.

तेलंगणाचे कृषिमंत्री तुम्माला नागेश्वरा राव यांनी केंद्राकडे आणखी २५ हजार टन खेरदीची परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन केंद्राने परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केंद्राला केली आहे.

तेलंगणातील सोयाबीन खेरदी

केंद्राने तेलंगणाला ५९ हजार ५०८ टन सोयाबीन खेरदीचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी आतापर्यंत २७ हजार ८११ टन खरेदी अदीलाबाद जिल्ह्यात झाली. निर्मल जिल्ह्यात १४ हजार ४७६ टन, कमारेड्डी जिल्ह्यात ७ हजार ८६७ टन, निजामाबाद जिल्ह्यात ५ हजार ४१३ टन आणि संगारेड्डी जिल्ह्यात ३ हजार ३३९ टन खरेदी झाली, असे तेलंगाणाचे तुम्माला नागेश्वरा राव यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bt Cotton Seeds Rate : २०२६ च्या खरीपसाठी बीटी कपाशी बियाण्यांचे दर 'जैसे थे'; केंद्र सरकारचा निर्णय

ZPFMS Shutdown: झेडपीएफएमएस बंद; वित्तीय व्यवहार ठप्प

Water Conservation: ऐंशीव्या वर्षीही पाणी प्रश्‍नाला भिडलेले खानापूरकर!

Seed Festival: जालना, अकोला, जळगाव येथे बियाणे महोत्सव

Agriculture Electricity: २०२७ पर्यंत सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिवसा वीज, राजस्थान सरकारची महत्त्वाची योजना

SCROLL FOR NEXT