Flood Relief : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने आवक कमी होऊ लागली आहे. यामुळे कोयनासह प्रमुख धरणांतून सुरू असलेला पाणी विसर्गात घट करण्यात आली आहे. सध्या सर्वच धरणांत ८५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला असून पुढील काळात पावसाच्या प्रमाणावर विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे..जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरण पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून सुरू करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेला कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सोमवारी सकाळी नऊ वाजता पाच फुटांवरून चार फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत..Drinking Water Shortage: उन्हाच्या चटक्याने पाण्याची मागणी वाढली.यामुळे दरवाजातून २३५८५ व पायथा वीज गृहातून १०५० क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात केला जात आहे. कोयना धरणात सकाळी आठ वाजता ९१.४२ टीएमसी (८६.८६ टक्के) व उपयुक्त ८६.३० टीएमसी (८६.१९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात ३३,२८४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. इतरही धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. धोम ५३५०, धोम-बलकवडी १३२९, कण्हेर २३३५, उरमोडी १७१९, तारळी २१८२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. .Maharashtra Dam: राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग.मागील आठ दिवसांत दमदार पाऊस झाल्याने सर्वच प्रमुख धरणात ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील काळात पावसाचा जोर कसा राहील यावर पाण्याचा विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे..धरणांतील एकूण पाणीसाठा टीएमसी व कंसात टक्केवारीकोयना ९१.४२ टीएमसी ( ८६.८६), धोम ११.९८ (८६.७४), धोम-बलकवडी ३.५६ (८७.२५), कण्हेर ९.५९ (९४.९५) उरमोडी ९.१५ (९१.८७), तारळी ५.२७ (९०.०९)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.