Highway Farmers Protest : नाशिक रिंग रोडमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मंगळवारी (ता. ४) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत चुकीचे अलाइनमेंट बदलणे, न्याय्य मोबदला निश्चित करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. ही माहिती छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिली..या पार्श्वभूमीवर कालिका माता मंदिर हॉल येथे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १४ मागण्यांपैकी १२ मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे लेखी पत्र दिल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्यांमध्ये आवश्यक सुधारणा करून त्या नव्याने सादर करण्याचे ठरले..Daytime Power Supply: बिहारमध्ये शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडीत वीजपुरवठा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश .बैठकीत मखमलाबाद–गोवर्धन रिंग रोडचे विद्यमान अलाइनमेंट बदलून ते गवळवाडीमार्गे करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, विहिरी, फळबागा आदींचे योग्य मूल्यमापन करून न्याय्य मोबदला देण्याची मागणीही करण्यात आली..Ring Road Project: रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा चुकीच्या मोजणीवर आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह निवेदन.मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली असून, शेतकरी प्रतिनिधी चुकीच्या अलाइनमेंटबाबतचे पुरावे आणि सविस्तर अहवाल सादर करणार आहेत..दरम्यान, मंगळवारच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ रिंग रोड बाधित शेतकरी आत्मक्लेश आंदोलन करतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला. “आश्वासन नव्हे, न्याय हवा,” अशी एकमुखी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.