Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : धाराशिव जिल्ह्यात मुदतीत सोयाबीन खरेदी अशक्य

Soybean Market : हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ३२ हजार २९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी आतापर्यंत म्हणजे तीन महिन्यांत केवळ सुमारे ६ हजारांवर शेतकऱ्यांकडून १ लाख ६६ हजार क्विंटल सोयाबीनचीच खरेदी करण्यात आलेली आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यातील २१ हमीभाव केंद्रांतील बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, त्यापूर्वी १५ ते २० दिवस ही खरेदी थांबलेली होती. आता ३१ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत असली तरी १२ दिवसांत सुमारे २६ हजारांवर शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी अशक्य आहे. मात्र, आणखी मुदतवाढ मिळू शकते. नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्याचे नियोजन आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ३२ हजार २९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी आतापर्यंत म्हणजे तीन महिन्यांत केवळ सुमारे ६ हजारांवर शेतकऱ्यांकडून १ लाख ६६ हजार क्विंटल सोयाबीनचीच खरेदी करण्यात आलेली आहे.

सोयाबीन खरेदीची मुदत संपण्यास आणखी १२ दिवस शिल्लक आहेत. या १२ दिवसांत उरलेल्या २६ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची नाफेड नेमकी कशी खरेदी करू शकणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीस आणखी मुदतवाढ मिळण्याची गरज असून खरेदीला वेग देणेही आवश्यक आहे.

दरम्यान, नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या ३२ हजारांवर दिसत असली तरी पैशांची निकड, हमीभाव खरेदी केंद्रात विक्री करण्यास होत असलेला विलंब आदी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी बाजारात सोयाबीनची विक्री आधीच केलेली आहे. मात्र, नोंदणीच्या यादीत त्यांची नावे कायम आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ शकते, असे काही केंद्रचालकांचे म्हणणे आहे.

यंदा बारदान्याच्या विस्कळित नियोजनामुळे हमीभावातील सोयाबीन खरेदीचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी आता सोयाबीनच्या खरेदीचे आव्हान नाफेडपुढे निर्माण झाले आहे. ही खरेदी पूर्ण करायची असेल, तर आणखी मुदतवाढ मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी स्थिती आहे. त्यातही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे १६ हजारांवर शेतकऱ्यांनाच सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचे संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही हजारो शेतकऱ्यांना संदेश पाठविणे बाकी आहे.

वायदे बाजार सुरू झाल्यास अडचण नाही

शासनाकडून सोयाबीन खरेदीचे नियोजन नीटनेटके नाही. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे. दुसरीकडे नोंदणी केलेले सगळे शेतकरी अजून विक्रीपासून राहिलेले नाहीत. अनेकांनी खासगी बाजारात मालाची विक्री केलेली आहे.

निम्म्यावर शेतकरी विक्रीसाठी येतही नाहीत. ३१ मार्चनंतर सोयाबीनचा वायदे बाजार चालू होऊ शकतो. त्यामुळे खासगी बाजारातील दर वाढून हमीभावाइतका दर शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांकडे फिरकणारही नाहीत, अशी शक्यता आहे. अशी शक्यता एका हमीभाव खरेदी केंद्रचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT