Edible oil  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import Duty : सोयाबीन भावात आजच २०० रुपयांची वाढ; सरकारचा खाद्यतेल आयातशुल्कात २० टक्क्यांची वाढ

Soybean Oil Market : सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली. आता कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफूल तेल आयातीवर २७.५ टक्के आयातशुल्क लागू होणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली. आता कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफूल तेल आयातीवर २७.५ टक्के आयातशुल्क लागू होणार आहे. तर रिफाईंड तेलाच्या आयातीवर यापुढे ३५.७५ टक्के आयातशुल्क लागू होणार आहे. सरकारने यापुर्वीच हमीभावाने सोयाबीन खरेदी जाहीर केली. आयात खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याचा परिणाम लगेच बाजारावर जाणवला असून दरात आज २०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. 

केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.१४) आयातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. यापुर्वी कच्चे सोयातेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पामतेल आयातीवर केवळ ५.५ टक्के शुल्क होते. तर रिफाईंड तेलावर १३.७५ टक्के आयात शुल्क होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त खाद्यतेलाची आवक होऊन देशातही भाव कमी झाले होते. याचा फटका देशात उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनसह तेलबिया पिकांच्या भावावर होत होता. शेतकरीच नाही तर प्रक्रियादार, रिफायनरीज् आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी करत होते. 

सरकारने आता नव्या सोयाबीन हंगामाच्या तोंडावर आयात शुल्कात वाढ केली. यामुळे सोयाबीन भावाला आधार मिळणार आहे. सरकारने आता कच्चे आणि रिफाईंड तेलाच्या आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे कच्चे सोयाबीन, कच्चे पामतले आणि कच्च्या सूर्यफुल तेलावर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (सेस), आणि सामाजिक कल्याण अधिभारसह (सरचार्ज) एकूण २७.५ टक्के आयातशुल्क लागू झाले. तर रिफाईंड सोयातेल, रिफाईंड पामतेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावर एकूण ३५.७५ टक्के आयातशुल्क लागू झाले आहे. 

सोयाबीन भावात वाढ

सरकारने यापुर्वीच हमीभावाने सोयाबीन खेरदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सोयाबीनच्या भावात १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढ होऊन भाव ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचले होते. आता खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याने दरात आज पुन्हा १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. अनेक बाजारात सोयाबीनचा भाव ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचले. तर प्रक्रिया प्लांट्सचा खरेदीचा भाव ४ हजार ९०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान काढले होते. नव्या हंगामातील सोयाबीन बाजारात येण्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

आंतरराष्ट्रीय सोयातेल बाजारात पडझड

भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात करतो. जास्त वाटा पामतेलाचा असतो. त्यानंतर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात होते. भारताने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला असून शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर शुक्रवारी सोयातेलाचे भाव २.१४ टक्क्यांनी पडले होते. पामतेलाच्या बाजारात सोमवारपासून भारताच्या या निर्णयाचा परिणाम दिसू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT