Amravati News: केंद्र सरकारने सोयाबीन, तुरीसह विविध शेतीमालाच्या हमीभावात वाढ केली आहे. मात्र त्यानंतर ही स्थानिक बाजार समितीत शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात सोयाबीनला ४१०० ते ४३४१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, दरात वाढीची शक्यता नसल्याने आवक एक हजार क्विंटलच्या पुढे गेली आहे.
सोयाबीनला गेल्या हंगामात ४८९२ असा हमीभाव होता. त्यात यंदाच्या हंगामात ४३६ रुपयांची वाढ करून ५३२८ रुपये असा दर जाहीर करण्यात आला आहे. परंतु वाढती आयात त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी असलेले दर आणि बाजारात मागणी नसल्याचे कारण देत सोयाबीनला सध्या ४१०० ते ४३४१ रुपये असा दर खुल्या बाजारात मिळत आहे. अमरावती बाजार समितीत सोयाबीनसोबतच संकरित ज्वारीची आवक होत असून, १५०० ते १८५० रुपये असा दर मिळत आहे.
याची आवक १०७ क्विंटल आहे. लोकवन गव्हाची आवक १११ क्विंटल असून २८०० ते ३००० रुपयांनी गव्हाचे दर होत आहे. तुरीची आवक देखील वाढती असून ती २२३५ क्विंटलवर पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या तूरीला ६४५० ते ६७११ रुपयांचा दर मिळत आहे. हा दर देखील हमीभावाच्या तुलनेत कमी होता. मुगाची देखील काही प्रमाणात आवक होत असून ती सात क्विंटल इतकी आहे.
६००० ते ६७०० रुपये असा दर मुगाला होता. हरभरा आवक ७७८ क्विंटल असून, याचे दर ५२०० ते ५५०० रुपयांवर होते. उन्हाळी हंगामातील तिळाचे दरही काहीसे दबावात असल्याचे चित्र आहे. सध्या तिळाचे व्यवहार ७००० ते ८२५० रुपयांनी होत आहेत. तिळाची आवक ७१ क्विंटलची होत आहे.
आंबा आवक नियमित
बाजारात तोतापुरी आंब्याची आवक ११० क्विंटलची झाली. याचे दर १६०० ते २२०० रुपये क्विंटलवर आहेत. लंगडा जातीच्या आंब्याचे दर ३००० ते ४००० रुपये आणि आवक १२० क्विंटलची नोंदविण्यात आली. दशहरी आंब्याची आवक ११० क्विंटल आणि दर ३००० ते ४००० रुपये असा होता. कैरीला ३००० ते ५००० रुपयांचा दर मिळत आवक १४० क्विंटलची झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.