Local Body Election : राज्यात पाच वर्षात १०० टक्के शेत रस्ते पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती

Devendra Fadanvis : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वर्ध्यातील सेवाग्राम चरखागृहात मंथन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदारांसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बैठकीला संबोधित करताना बोलत होते.
CM Fadanvis
CM FadanvisAgrowon
Published on
Updated on

Shet Raste maharashtra : राज्यात पुढील ५ वर्षात शेतरस्ते पूर्ण करण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीच्या अहवालानुसार १०० टक्के शेतरस्ते पूर्ण करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२८) दिली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वर्ध्यातील सेवाग्राम चरखागृहात मंथन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदारांसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बैठकीला संबोधित करताना बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी चांगल्या गुणवत्तेचे शेतरस्ते करण्याची ग्वाही दिली. "अलीकडे सर्वात जास्त मागणी शेत रस्त्यांची असते. पाणंद रस्ते सगळीकडे मागितले जातात. त्यामुळे एकही रस्ता सोडायचा नाही. ५ वर्षात १०० टक्के रस्ते करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार शेत रस्ते करण्यात येतील."

CM Fadanvis
Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

राज्य सरकारने शेत रस्त्यासाठी अतिक्रमण मोकळं करणं सुरु केलं असून त्याचं आयडेटीफिकेशन आणि मार्किंग केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तसेच राज्यात चांगल्या गुणवत्तेचे १०० टक्के पाणंद रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

१ हजार लोकसंख्येच्या गावात सिमेंटचा रस्ता

१ हजार लोकसंख्येचं गाव असलेल्या प्रत्येक गावचा प्रमुख रस्ता, त्यामध्ये तालुका किंवा जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या गावात सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं जाहीर केलं. तसेच त्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची योजना केंद्र सरकारला सादर केली असून जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून योजना मंजूर करून घेत आहोत. परवा दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी याबद्दल चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

CM Fadanvis
Farm Road : शेत पाणंद रस्त्यांच्या अनुदानात वाढ ; १ किमी रस्त्यासाठी मिळणार ९ लाख रुपये

दरम्यान, राज्यात शेत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सरकारने शेतरस्त्यांची स्थिती सुधारून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com