Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : खानदेशात सोयाबीनची आवक घटली

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजारांत सोयाबीनची आवक या पंधरवड्यात घटली आहे. दर टिकून असून, किमान ४६०० व कमाल ५०५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दराच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. दर टिकून असल्याने काही शेतकरी हा साठा विक्रीसाठी काढत आहेत.

वाळवून व स्वच्छ करून साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना या टिकून असलेल्या दरांचा लाभ होत आहे. परंतु कमाल शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच सोयाबीनची विक्री केली. सोयाबीनचे उत्पादन खानदेशात यंदा कमी झाले. कमी पावसाने अनेक शेतकरी पेरणी करू शकले नाहीत. त्यात क्षेत्र घटले. परिणामी यंदा आवक सुरवातीपासून कमीच राहिली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला दर मात्र कमी होते.

किमान ४००० व कमाल ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत होते. परंतु परतीचा पाऊस न आल्याने दर्जेदार पीक हाती आले. ऑक्टोबरच्या मध्यानंतर दरात सुधारणा सुरू झाली. ही सुधारणा नोव्हेंबरमध्येही सुरूच होती.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीनला किमान ४३०० व कमाल ४८०० रुपये प्रतिक्विंटलचा तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, अमळनेर या बाजारांत मिळाला. तर दुसऱ्या पंधरवड्यात ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दर्जेदार सोयाबीनला ५०६५ रुपये प्रतिक्विटलपर्यंत देखील दर मिळाला.

ऑक्टोबरमध्ये खानदेशातील प्रमुख चार बाजार समित्यांत सोयाबीनची प्रतिदिन सरासरी ९०० क्विंटलवर आवक झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ही आवक प्रतिदिन सरासरी ८५० क्विंटल होती. तर दुसऱ्या पंधरवड्यातील आवक ७०० क्विंटलवर आली. चोपडा येथील बाजार समितीत या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीनची प्रतिदिन सरासरी २०५ क्विंटल आवक झाली.

ती मागील सहा ते सात दिवस प्रतिदिन सरासरी १४० क्विंटल राहिली. बुधवारी (ता. २२) चोपडा बाजार समितीत १२० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर दर किमान ४६००, कमाल ५०६१ व सरासरी ४९०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

जळगाव बाजार समितीतदेखील सोयाबीनची आवक मागील सहा ते सात दिवसात कमी झाली असून, प्रतिदिन सरासरी १६० क्विंटल एवढी आवक झाली आहे. दरही किमान ४५५०, कमाल ५००० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाल्याची माहिती आहे. धुळ्यातील बाजारांत आवकेत जळगाव जिल्ह्यातील बाजारांच्या तुलनेत अधिकची घट दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT