Cotton Bales  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Bales : शेतकरी गटांनी बनवल्या सहाशेवर कापूस गाठी

 गोपाल हागे

Akola News : कापूस ते गाठी अशा प्रकारची मूल्यवर्धनाची साखळी जिल्ह्यात राबवली जात आहे. याअंतर्गत अकोट उपविभागात अकोट व तेल्हारा तालुक्यांतील एकूण सहा शेतकरी गटांनी पुढाकार घेऊन सहाशेवर गाठी या हंगामात तयार केल्या. चांगले दर आल्यानंतर विक्री केली जाईल तर सरकीतूनही चांगली मिळकत केली आहे.

स्मार्ट प्रकल्पातून कापूस प्रकल्प राबवला जात आहे. यात सन २०२३-२४ यावर्षात अकोट तालुक्यातील मिर्झापूर, पुंडा, रौंदळा, अडगाव खुर्द गावांतील गट सहभागी झाले. त्यानुसार एकता शेतकरी गटाने (मिर्झापूर) ४९० क्विंटल कापूस संकलित केला. त्याच्या ११६ गाठी बनवल्या. ३२८ क्विंटल यातून सरकी मिळाली.

२६५० रुपये प्रतिक्विंटलला सरकीला दर मिळाला. पुंडा येथील रॉयल कास्तकार शेतकरी उत्पादक गटाने ३०० क्विंटल कापूस प्रकल्पात देत ६८ गाठी बनवल्या. २०१ क्विंटल सरकी २७२० रुपयांनी विक्री केली. रौंदळा येथील संत तुकाराम महाराज शेतकरी गटाने ४२१ क्विंटल कापूस देत १०० गाठी बनवल्या.

२८२ क्विंटल सरकी २८६० रुपये दराने विक्री केली. तर अडगाव खुर्द येथील श्री लक्ष्मीमाता शेतकरी उत्पादक गटाने सर्वाधिक ५९५ क्विंटल कापूस संकलित केला. यापासून १२७ कापूस गाठी तयार झाल्या. तर सुमारे ३९९ क्विंटल सरकी मिळवली. ही सरकी ३०४० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली. गेल्या हंगामातही या तालुक्यात शेतकरी गटांनी सहभागी होऊन कापूस पिकवून त्यापासून गाठी तयार केल्या होत्या.

तेल्हारा तालुक्यातही शेतकरी गटांनी गाठी बनवल्या. यात दहिगाव येथील जय भवानी शेतकरी गटाने ४९४ क्विंटल कापूस संकलित करीत ११५ गाठी तयार केल्या. यातून २८७ किलो सरकी निघाली. २६६० रुपये क्विंटल दराने विक्री केली. शिरसोली येथील माऊली शेतकरी गटाने ४२४ क्विंटल कापूस गोळा करीत ९७ गाठी निर्माण केल्या. २४९ क्विंटल सरकी २८३० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली. या तालुक्यात एकूण २१२ गाठी तयार झालेल्या आहेत.

तालुकानिहाय तयार गाठी

तालुका गट संख्या तयार गाठी

अकोट ४ ४११

तेल्हारा २ २१२

एकूण ६ ६३३

कापूस उत्पादकांच्या कापसाला अधिक दर मिळण्याच्या उद्देशाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत मूल्यवर्धन केले जात आहे. सद्यःस्थितीत शेतकरी वापरत असलेल्या बियाण्यात रुई उतारा कमी मिळतो. देशाचा सरासरी रुई उतारा १०० किलो कापसातून ४३ किलो तर महाराष्ट्राचा अवघा ३३ किलो आहे. सरळसरळ १० किलोचे नुकसान जड बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना सोसावे लागते. रुई सरासरी २४० रुपये प्रति किलो तर सरकी ३० रुपये प्रति किलो आहे. हा विरोधाभास लक्षात घेऊन रुई उतारा अधिक मिळेल यासाठी प्रयत्नशील राहून बियाणे निवड करताना हलके बियाण्याची निवड केली. कापसाचे हे अर्थकारण समजून घेत अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनावर भर दिला आहे.
- सुशांत शिंदे, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी, अकोट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT