Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवडीसह यांत्रिकीकरण गरजेचे

Dr. Tilakraj Sharma : कपाशीच्या अधिक उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतीसह यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांनी केले.
Annual Review of Research Projects
Annual Review of Research ProjectsAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कापसासारख्या नगदी पिकाला गंभीरतेने घेणे काळाची गरज असून कपाशीच्या अधिक उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवड पद्धतीसह यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांनी केले.

Annual Review of Research Projects
Cotton Productivity : कापूस उत्पादकतेत २० ते ५६ टक्‍के वाढ

कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या दोन दिवसीय वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत डॉ. शर्मा बोलत होते.

त्यांनी अतिशय सुस्पष्ट आणि परखड मत प्रदर्शित करीत देशांतर्गत सध्याची पीकपद्धती आणि कृषी संशोधकांची भूमिका अधोरेखित केली. काळसुसंगत पीक वाण, सेंद्रिय-एकात्मिक अन्नद्रव्य तथा कीड-रोग व्यवस्थापन, बाजारात अधिक स्थान असणाऱ्या तंत्रज्ञानाची सर्वदूर प्रशिक्षणे आणि प्रात्यक्षिके, उत्पादन तंत्रज्ञानासह सेंद्रिय तथा रंगीत कापूस पिकासाठी विविध पद्धतीवर सविस्तर उहापोह करीत या दोन दिवसांच्या संमेलनातून देशांतर्गत शेती व्यवस्थेला सक्षम तंत्रज्ञान आणि शिफारशी देता येतील, असा आशावाद व्यक्त केला.

Annual Review of Research Projects
Cotton Productivity : कापूस उत्पादकता वाढीसाठी पूरक तंत्रज्ञानाला पाठबळ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी, काळाची गरज ओळखून सेंद्रिय पद्धतीने कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित होण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची मोट बांधण्याचे आवाहन केले.

भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीचे सहायक महनिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादवा, सहायक महनिदेशक (व्यापारी पिके) डॉ. प्रसंता दाश, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे निदेशक डॉ. वाय. जी. प्रसाद, कृषी वैज्ञानिक भरती बोर्ड, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष तथा अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्पाच्या कार्यक्रम निरीक्षण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आदी प्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com