Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मक्‍याचा देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा

Maize Shortage : पोल्ट्री, कापड आणि इथेनॉल उद्योगाची वाढती मागणी त्या तुलनेत देशांतर्गत असलेली कमी उत्पादकता या कारणामुळे मक्‍याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पोल्ट्री, कापड आणि इथेनॉल उद्योगाची वाढती मागणी त्या तुलनेत देशांतर्गत असलेली कमी उत्पादकता या कारणामुळे मक्‍याचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील काही भागात मका प्रतिक्‍विंटल ३००० रुपयांवर पोहचला असून महाराष्ट्रात देखील मक्‍याचे व्यवहार २७०० ते २९०० रुपयांनी होत आहेत.

देशात दरवर्षी सुमारे ३५० ते ३८० लाख टन मका उत्पादन होते. तर दुसरीकडे देशांतर्गत मका मागणी ४०० लाख टन आहे. त्यामुळे दरवर्षी थोड्याफार प्रमाणात मक्‍याचा तुटवडा निर्माण होतो, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. बिहार सरकारने जैवइंधनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे बिहारमध्येच मक्‍याला मागणी वाढली आहे. बिहार राज्यात १७ ते १८ रुपये किलो दर होता. परंतु मागणी वाढल्याने दर २२ ते २३ रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत.

इथेनॉल त्यासोबतच जैव इंधनासाठी मका वापर वाढल्याने त्याचा थेट फटका कुक्‍कुटपालन व्यवसायाला बसला आहे. महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मक्‍याचे व्यवहार २२०० ते २८०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. कुक्‍कुटपालकांना याची विक्री २७०० ते २९०० रुपये क्‍विंटलने होत आहे.

तयार पशुखाद्याचे दरही सरासरी २० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. त्यामुळे लेअर आणि ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. पशुखाद्यातील वाढीच्या तुलनेत ब्रॉयलर पक्षी आणि अंडी दरात वाढ होत नसल्यामुळे उत्पादकता खर्चाची भरपाई कशी करावी, असा प्रश्‍न व्यवसायिकांसमोर आहे.

खरीप, रब्बीतही मका

खरीप आणि रब्बी हे दोन मुख्य हंगाम असले तरी देशातील काही भागात वर्षभर मका लागवडीचा पॅटर्न राबविला जातो. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याची साखळी बऱ्याअंशी पूर्ण होते. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी बिहारमधील मका देशभराची गरज पूर्ण करतो.

कोंबड्याच्या एकूण खाद्यात मका वापर ६० टक्क्यांपर्यंत असतो. सध्या बाजारात मकाच नसल्याचे कारण सांगत आधीच सौदे केले असताना देखील मका पुरवठ्यास टाळाटाळ केली जात आहे. पूर्वी करार करून तुटवड्याआड २७१० रुपयांनी मका पुरवठा केला. येत्या काळात त्यात वाढीची शक्‍यता आहे.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती
दर वाढल्याने पोल्ट्री व्यवसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ मका आयातीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. सध्या मक्‍यावर १५ टक्‍के आयात शुल्क आहे. २२०० रुपये खरेदी दर आणि आयात शुल्क अपेक्षित धरता २८०० ते २९०० रुपयांना आयात होईल. केंद्राने मका आयात शुल्क माफ करावे.
- संजय नळगीळकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फार्मर्स ऍण्ड ब्रीडर्स असोसिएशन.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस

Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा

Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT