Milk Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : मुंबईत सुटे दूध विक्री दरात उद्यापासून सात रुपयांनी वाढ

नव्याने लागू केलेले दर फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागू असतील, असाही निर्णय महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.

टीम ॲग्रोवन

मुंबई : शहरात होणाऱ्या सुट्या दूध विक्रीत (Loose Milk Rate) सात रुपयांची वाढ करण्यात आली असून १ सप्टेंबरपासून नवे दर (Milk Rate) लागू होणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने हा निर्णय घेतला असून अमूल दूध आणि अन्य दूध संघांनी दोन रुपयांची वाढ केल्यानंतर महासंघाने हा निर्णय घेतला आहे. सध्या सुट्‍या दुधाचा प्रतिलिटर दर ७३ ते ७५ रुपये आहे.

नव्याने लागू केलेले दर फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागू असतील, असाही निर्णय महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई शहरात अमूल आणि गोकुळ या दोन ब्रँडचे दूध मोठ्या प्रमाणात विक्री होते; मात्र, मुंबई आणि ठाण्यासह अनेक ठिकाणी सुटे दूधही मोठ्या प्रमाणात विकले जाते. अनेक ठिकाणी तबेल्यांतील म्हशींचे दूध घरोघरी विक्री होते. वाढत्या महागाईमुळे जनावरांच्या चाऱ्याच्या दरातही वाढ झाली आहे.

हरभरा आणि अन्य खाद्यांच्या दरातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मुंबई दूध उत्पादक महासंघाचे सदस्य सी. के. सिंह यांचे म्हणणे आहे. दरवाढीबाबत घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली. मुंबई शहरात रोज सात लाख लिटर दूधविक्री होते. याआधी मुंबईत अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली असून १७ ऑगस्टपासून नवे दर लागू केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Trade Deal : युरोपियन महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित जपणार; प्रस्तावित करारावर ब्रुसेल्समध्ये चर्चा

Automatic Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी ५४६ शासकीय जागा उपलब्ध

E-Sakal: डिजिटल मराठी पत्रकारितेत ई-सकाळ पुन्हा एकदा नंबर वन; वाचकसंख्या १९.५ कोटींवर

Agrowon Podcast: सोयाबीन दरात सुधारणा; कापसाचे भाव वाढले, बाजरी टिकून, लसणाला मागणी तर काकडीला उठाव

Livestock Fodder: माळरानात चारा संपला

SCROLL FOR NEXT