
वारणानगर, जि. कोल्हापूर : पशुखाद्य (Animal Feed), चाऱ्याची टंचाई (Fodder Shortage) व वाढलेले दर या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना (Milk Producer) दिलासा देण्यासाठी वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी (Cow Milk Purchase Rate) दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केली आहे,’’ अशी माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. तप दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाने गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयांनी वाढ केली आहे,’’ अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
डॉ. कोरे म्हणाले, ‘‘दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने १ सप्टेंबरपासून गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये प्रमाणे वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता ३.५ फॅटला व ८.५ एसएनएफला तो ३२ रुपये झाला आहे.’’
‘‘दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. महापूर, अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशू वैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच, व रेडी संगोपन यासारखे अनेक उपक्रम संघामार्फत राबविले जात आहे,’’ अशी माहिती कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकांउट्स व्यवस्थापक सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, विपणन प्रमुख अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.
सुधारित दरपत्रक पाठविणार
गोकूळचा गाय दूध खरेदी दर ३. ५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये ३१ रुपये दर राहील, अशी माहिती पाटील यांनी दिली. संघाने गाय दूध खरेदी दरात वाढ चार वेळा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.