Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात तेजी

मुकूंद पिंगळे

Nashik News : गत रब्बी हंगामात उन्हाळ कांदा लागवडी काढणीच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून साठवणूक केली; मात्र पुढे साठवणूकपश्चात ऑगस्टपर्यंत दर उत्पादन खर्चाच्या खाली होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कांदा राखून ठेवला होता.

त्यामुळे दिवाळीनंतर बाजार समित्यांत उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. तर दुसरीकडे पाऊसमान कमी असल्याने खरीप लाल कांद्याच्या लागवडी घटल्याने दसऱ्यानंतर सुरू होणारी आवक अद्याप अपेक्षित नाही. मात्र उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला अधिक दर मिळत असल्याची स्थिती आहे.

गेल्या तीन वर्षांत मजूर टंचाई व कृषी निविष्ठांच्या दरात झालेली भरमसाट वाढ यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च सातत्याने वाढत आहे. असे असले तरीही त्यात प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असतानाही शेतकरी कांद्याची लागवड करत आहेत. मात्र नैसर्गिक आपत्तीचा सामना करूनही आर्थिक नुकसान होते आहे.

त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप कांदा लागवडी यंदा निम्यावर आल्या आहेत. त्यामुळे दसऱ्यानंतर नियमित सुरू होणारी आवक दिवाळी होऊनही अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने उन्हाळ व खरीप कांद्याचे स्थिर झाले आहेत. मात्र खरीप कांद्याला तुलनेत पसंती असल्याने दरात तफावत आहे.

विंचूर उपबाजार आवारात सर्वाधिक आवक

जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत, येवला, लासलगाव, उमराणे, मुंगसे या बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक सर्वधिक असून नवीन खरीप लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे.

समित्यांमध्ये अधिक दिवस कामकाज बंद असल्याने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसह लगतच्या येवला, कोपरगाव, सिन्नर, चांदवड यासह देवळा व मालेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी विंचूर उपबाजाराला पसंती दिल्याचे दिसून येते. कांद्याची सर्वाधिक आवक येथे होत असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समितीनिहाय स्थिती (आवक/सरासरी दर) बुधवार (ता. २२)

बाजार समिती...उन्हाळा कांदा...खरीप कांदा...दरातील तफावत

पिंपळगाव बसवंत...९,०००/३,३००...५,०००/३,८००...४,०००/५००

विंचूर (लासलगाव)...१६,३४०/३,१००...२,९००/३,८५०...१३,४४०/७५०

येवला...७,०००/२,९५०...२५/३,२९०...६,९७५/३४०

मनमाड...३,०००/२८००...७००/३,६००... २,३००/८००

उन्हाळ कांद्याची आवक कमी होऊन नवीन खरीप लाल कांदा आवक दिवाळीनंतर सुरू होते. ग्राहकांचा कल नवीन कांद्याकडे असतो. त्यातच साठवलेल्या उन्हाळ कांद्याची चव बदलते. त्यात नवीन कांद्याला गुणवत्ता व प्रतवारी असल्याने तुलनेत अधिक दर आहेत.
- नरेंद्र वाढवणे, सचिव-लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
यंदा खरीप कांदा हंगाम अडचणीत आहे. कांदा असून नसल्यासारखा आहे. कांद्याच्या लागवडी होत्या मात्र काढणीपूर्वीच अनेक ठिकाणी लागवडी सोडून देण्याची वेळ आली. त्यामुळे अपेक्षित प्रमाणावर उत्पादन हाती आले नाही. तर दुसरीकडे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी आहे. त्यामुळे दर असले तरी विकायला शेतकऱ्यांकडे कांदा नाही, थोड्याफार प्रमाणात काढणी होऊन विक्री सुरू आहे.
- कौतिक जाधव, कांदा उत्पादक, दरेगाव, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT