Onion Arrival : पिंपळगाव बसवंतला लाल कांद्याची आवक सुरू

Onion Market : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २०) रोजी लाल कांद्याची टॅक्टर व पिकअपमधून आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान १,५०० कमाल ५,१२५ तर सरासरी ४,२०० दर मिळाला.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप हंगामातील लाल कांदा लागवडी प्रभावी झाल्या आहेत. तुलनेत अद्यापही अपेक्षित प्रमाणात बाजार समितीमध्ये आवक होत नसल्याची स्थिती आहे. आता दिवाळीनंतर पुन्हा बाजार सुरू झाल्यानंतर आवक थोडीफार वाढू लागली आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारावर सोमवारी (ता. २०) रोजी लाल कांद्याची टॅक्टर व पिकअपमधून आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान १,५०० कमाल ५,१२५ तर सरासरी ४,२०० दर मिळाला.

Onion Market
Onion Market : विंचूर उपबाजाराची कांदा लिलावात आघाडी

आशिया खंडात नावाजलेली बाजार समिती पिंपळगाव बसवंत बाजार समितीची ओळख आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्रात तसेच लगतच्या तालुक्यात प्रामुख्याने कांदा, टोमॅटो या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. त्यात पिंपळगांव बसवंत बाजार समितीत कांदा या शेतीमालाचे नियमीत लिलाव होत असतात.

लाल कांद्याची आवक बाजार समितीत सुरू झाली असून सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या शुभहस्ते लाल कांद्याच्या लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी व्यापारी गटाचे संचालक सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, तसेच नारायण पोटे, ज्ञानेश्वर शिरसाट, अतुल शहा, जेठमल ठक्कर, शोभाचंद पगारीया, दिनेश बागरेचा, संकेत पारख आदी उपस्थित होते.

Onion Market
Nashik Red Onion : नवीन खरीप लाल कांद्याची नाशिकमध्ये आवक सुरू ; मुहूर्ताला २,४३० रुपये दर

बाजार समितीमध्ये खरीप लाल कांद्याची आवक तुलनेत कमी आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत क्विंटलला ७०० रुपये दर अधिक आहे. तर उन्हाळ कांद्याची आवक अधिक होत असली तरीही त्यास गुणवत्ता व प्रतवारीनुसार खरीप कांद्याच्या तुलनेत कमी दर मिळाले.

सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी लिलावाच्या नियमीत वेळी सकाळी ९.०० वा. पिंपळगांव बसवंत बाजार समितीचे मुख्य आवारावर कांदा हा प्रतवारी करुन विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com