Edible Oil agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import : खाद्यतेलाची विक्रमी आयात

भारताल दरवर्षी जवळपास ६५ टक्के खाद्यतेल आयात करावं लागतं. त्यात पामतेलाचा मोठा वाटा आहे. खाद्यतेल आयातीवर मोठा खर्चही होतो. त्यामुळं आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी सरकारनं खाद्यतेल मिशनची घोषणा केली. मात्र सरकारची धोरणं आपल्याच मिशनच्या विरोधी दिसतात.

अनिल जाधव

पुणेः भारतात मागील तीन महिन्यांमध्ये देशात विक्रमी खाद्यतेल आयात (Record Edible Oil Import) झाली. सप्टेंबरमधील आयात ही आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली. मात्र या आयातीचा तेलबिया दरावर (Oil Seed Rate) परिणाम होत आहे. खाद्यतेल आयातीवर (Edible Import) शुल्क नगण्य असल्यानं सोयाबीन दर (Soybean Rate) दबावात आहेत. तर मोहरी लागवडीवरही (Mustard Cultivation) परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

भारताल दरवर्षी जवळपास ६५ टक्के खाद्यतेल आयात करावं लागतं. त्यात पामतेलाचा मोठा वाटा आहे. खाद्यतेल आयातीवर मोठा खर्चही होतो. त्यामुळं आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी सरकारनं खाद्यतेल मिशनची घोषणा केली.

मात्र सरकारची धोरणं आपल्याच मिशनच्या विरोधी दिसतात. देशातील सोयाबीनचा हंगाम सुरु झालाय. तर रब्बीतील मोहरीची लागवड सुरु झाली. मात्र खाद्यतेलाची आयात विक्रमी पातळीवर पोचलीये.

ऐन सोयाबीन लागवडीच्या काळातच दर पडले. त्यासाठी काही घटक कारणीभूत होते. त्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला खाद्यतेल पुरवठा, खाद्यतेलाचे घटलेले दर, वाढती खाद्यतेल आयात आणि वायद्यांवरील बंदी यांचा प्रामुख्यानं समावेश होतो.

लागवडीच्या काळात सोयाबीनला कमी दर राहील्यानं पेरा वाढला नाही. यंदा सोयाबीनचं क्षेत्र गेल्यावर्षीऐवढंच राहीलं. तर आता रब्बीतील महत्वाचं तेलबिया पीक असलेल्या मोहरीची लागवड सुरु झाली. मात्र आताही तेलबिया बाजार दबावात आहे.

देशात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेल आयातीत मोठी वाढ झाली. त्यामुळं तेलबिया बाजारावरही परिणाम झालाय. यंदा जुलै महिन्यात १२ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. ऑगस्ट मध्ये जवळपास १४ लाख टन तर सप्टेंबर महिन्यात तब्बल १६ लाख टन खाद्यतेल भारतात आयात झालं.

त्यामुळं तेलबिया पिकांना खाद्यतेलाकडून मिळणार आधार कमी झाला. भारत सरकारनं खाद्यतेल आयातीवरील शुल्क मोठ्या प्रमाणात घटलंय. तर सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलाची वर्षाला २० लाख टन आयात कोणत्याही शुल्काविना करण्यास परवानगी दिली. यामुळं खाद्यतेलाची आयात वाढली.

सध्या सोयाबीनचा बाजार दबावात आहे. मोहरीच्या लागवडीवरही दराचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळं खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढविण्याची मागणी केली जातेय. खाद्यतेल आयातशुल्कात वाढ केल्यास देशातील तेलालाही आधार मिळेल. परिणामी तेलबियांचेही दर सुधारण्यास मदत होईल. सरकारनं याकडं गांभीर्यानं पाहून निर्णय घेतल्यास सोयाबीन आणि मोहरी बाजार सुधारण्यास मदत होईल, असं जाणकारांनी सांगितलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT