Soybean Rate : जागतिक सोयाबीन उत्पादन खरचं वाढणार का?

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ३५३ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. यात ब्राझीलमधील उत्पादन २५० लाख टनानं वाढणार आहे. तर अर्जेंटीनातील उत्पादनात यंदा ७० लाख टनांची भर पडेल.
Soybean Production
Soybean ProductionAgrowon

पुणेः युएसडीएनं ऑक्टोबरचा जागतिक सोयाबीन उत्पादनाचा अंदाज (Global Soybean Production Estimate) जाहीर केलाय. यात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन (Soybean Production) वाढेल असं म्हटलंय. ब्राझील, अर्जेंटीना, चीन आदी देशांचं उत्पादन वाढेल, तर भारत आणि अमेरिकेतील उत्पादन घटेल, असा अंदाज युएसडीएनं (USDA) दिलाय. पण मागील हंगामातही युएसडीएनं सुरुवातीला या देशांमधील सोयाबीन उत्पादन वाढेल, असं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्ष उत्पादन घटलं होतं.

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ३५३ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. यात ब्राझीलमधील उत्पादन २५० लाख टनानं वाढणार आहे. तर अर्जेंटीनातील उत्पादनात यंदा ७० लाख टनांची भर पडेल. पेरुग्वे देशात ५८ लाख टनांनी तर चीनमध्ये २० लाख टनांनी उत्पादन वाढेल, असंही युएसडीएनं म्हटलंय.

Soybean Production
Soybean Rate : देशातील सोयाबीन उत्पादन कमीच राहणार

पण यापैकी ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांमध्ये आता कुठं पेरणी सुरु झाली. तसचं या देशांमध्ये यंदाही काही ठिकाणी पेरणीवर कमी पावसाचा परिमाण होताना दिसतोय. तसचं ला निना स्थितीही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतेय. याचाही परिणाम पुढील काळात होऊ शकतो. पण आत्ताच याबाबत निश्चित सांगता येत नाही. पुढील काळात वातावरण कसं राहीलं यावरून ब्राझील, अर्जेंटीना आणि पेरुग्वे या देशांमधील सोयाबीन उत्पादन किती येईल हे ठरेल.

मागील हंगामात काय होते अंदाज?

मागील हंगामातही प्रारंभीच म्हणजेच १२ ऑक्टोबर २०२१ च्या अहवालात युएसडीएनं ब्राझीलमध्ये १४४० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अंतिम उत्पादन १२७० लाख टन मिळालं. तर अर्जेंटीनामध्ये ५१० लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलं होतं. पण केवळ ४४० लाख टनांवर उत्पादन स्थिरावलं होतं. पेरुग्वेतील उत्पादनाचा अंदाज १०५ लाख टनांचा असताना केवळ ४२ लाख टन उत्पादन मिळालं. तर चीनमध्ये १९० लाख टन उत्पादन होईल असं सांगितलं असताना १६४ लाख टन उत्पादन होती आलं.

Soybean Production
Soybean Rate : सोयाबीनचं नुकसान; दर वाढले का?

मागील हंगामातील अंदाज आणि उत्पादन (लाख टनांत)

देश…अंदाज…उत्पादन

ब्राझील…१४४०…१२७०

अर्जेंटीना…५१०…४४०

चीन…१९०…१६४

पेरुग्वे…१०५…४२

त्यामुळं युएसडीएनं आता जो अंदाज दिलाय त्यात बदल होऊ शकतो, असं म्हणता येईल. पीक वाढीच्या आणि काढणीच्या काळात पाऊस आणि वातावरण कसं राहतं यावर या देशांमधील सोयाबीन उत्पादन अवलंबून राहील.

भारत, अमेरिकेतीची स्थिती

युएसडीएनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा ४१ लाख टनांनी कमी राहीलं असा अंदाज व्यक्त केलाय. यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन १ हजार १७४ लाख टनांवर स्थिरावेल. तर भारतातील सोयाबीन उत्पादन ४ लाख टनांनी घटून ११५ लाख टनांवर येईल, असंही युएसडीएनं म्हटलंय.

बाजाराचं लक्ष

सध्या केवळ अमेरिका आणि भारतात नवं सोयाबीन बाजारात दाखल झालंय. त्यामुळं बाजाराचं लक्ष या दोन देशांतील सोयाबीन उत्पादनावर आहे. त्यातच युएसडीएनं यंदा भारत आणि अमेरिकेतील उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केलाय. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवलाय. युएसडीएच्या अहवालानंतर सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे मागील दोन महिन्यांतील उचांकी पातळीवर पोचले होते. वायद्यांनी गुरुवारी १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा कमाल दर गाठला होता. त्यानंतर त्यात काहीशी घट होऊन १३.९३ डाॅलरवर स्थिरावले.

देशातील दरपातळी

देशातही सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसतोय. महाराष्ट्र, मध्य प्रेदश आणि राजस्थान या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये नुकसान वाढलंय. त्यामुळं बाजारभावात सुधारणा पाहायला मिळाली. सध्या बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकलं जातंय. तसचं प्रक्रिया प्लांट्सचे भाव हे ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या बाजारभावात चढ-उतार होत असले तरी शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com