Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : मंचर बाजारात कांद्याची विक्रमी आवक

Onion Rate : मंचर (ता. आंबेगाव) येथील बाजार समितीच्या आवारात (ता. ३०) कांद्याची सुमारे ९० हजार गोणी इतकी विक्रमी आवक झाली.

Team Agrowon

Onion Market Update Manchar : मंचर (ता. आंबेगाव) येथील बाजार समितीच्या आवारात (ता. ३०) कांद्याची सुमारे ९० हजार गोणी इतकी विक्रमी आवक (Onion Arrival) झाली. आत्तापर्यंतची ही आवक विक्रमी होती.

मात्र, त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात (Onion Market Rate) घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, कांदा प्रतवारीनुसार ५०० ते ७०० रुपये क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंतच्या विक्री केलेल्या कांद्याला क्विंटलला ३५० रुपये अनुदान देणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी ३१ मार्चअखेर कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला आणला होता. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव चांगलेच पडले आहेत.

त्यातच ३१ मार्च ही तारीख शुक्रवारी आल्याने शेतकऱ्यांनी मंचर बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे गुरुवारी (ता. ३०) बाजार समितीच्या आवारात कांद्याची मोठी आवक झालेली पाहायला मिळाली.

सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव नाही. कांदा पिकासाठी गुंतवलेले भांडवलही वसूल होत नाही. कांद्याला दहा किलोला दोनशे रुपयांच्या पुढे बाजारभाव मिळेल, तेव्हाच शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडणार आहे.

कांदा अनुदानाबाबतचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. बाजारभाव समाधानकारक मिळणार नाही तोपर्यंत राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान देणे गरजेचे आहे.

- तबाजी लोखंडे, कांदा उत्पादक शेतकरी, वळती

रविवारी (ता. २६) सुमारे ८० हजार कांदा पिशव्यांची आवक झाली होती. त्यावेळी क्विंटलला ६०० ते १२५० रुपये बाजार भाव मिळाला. त्या तुलनेत गुरुवारी (ता. ३०) प्रतवारीनुसार ५०० से ७०० रुपये क्विंटल दराने कांदा विकला गेला.

- वसंतराव थोरात, कांदा व्यापारी, मंचर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT