Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीचे दर पोहोचले दहा हजार रुपयांवर

Tur Market : कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांचे दर कोसळत असताना तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांचे दर कोसळत असताना तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात तुरीच्या दरात चारशे रुपयांची सुधारणा झाली. गुरुवारी (ता. २५) नवीन तुरीला ८९०० ते ९७०० रुपये दर मिळाला आता दर दहा हजारांच्या पुढे गेले आहेत.

गेल्या आठवड्यापासून तुरीच्या दरात सुधारणा कायम आहे. तुरीचे उत्पादन घटल्याने आणखी दरवाढीची शक्यता आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनच्या दरात चढउतार सुरू आहे. दुसरीकडे सद्यःस्थितीत तुरीचे दर दहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांत तुरीच्या दराच्या सुधारणेचा ट्रेंड कायम आहे. यवतमाळ खासगी बाजार समितीत ८९०० ते ९७०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे तुरीला भाव मिळतो आहे. येत्या काही दिवसांत तुरीचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता कृषी अभ्यासकांनी वर्तविली आहे. तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सर्वच बाजारांत तुरीला चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.

कापूस, सोयाबीनला अपेक्षानुसार भाव मिळाला नाही. आता तुरीला चांगले दिवस आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव मिळाल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

यवतमाळ खासगी बाजार समितीत २२ जानेवारीपासून तुरीच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. ८५०० ते ९५०० रुपये दर होते. त्यानंतर सातत्याने तीन दिवस दर वाढत होते. २३ जानेवारीला ८५०० ते ९३३०, २४ जानेवारी रोजी ८७०० ते ९५९५ तर २५ जानेवारीला ८९०० ते ९७०० रुपयांपर्यंत दर गेला आहे. काही ठिकाणी तुरीला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Crop Loss: अतिवृष्टीने राज्यातील डाळिंबे काळवंडली

Agriculture Department Corruption: कृषी अधिकाऱ्यांच्या खासगी कंपन्यांची चौकशी ‘एसीबी’कडे

Maharashtra Weather: राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा शब्दांची चलाखी

Crop Damage Compensation : संत्रा-मोसंबी बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT