Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : काही बाजारात तूर नरमली; हळदही घटली

Tur Rate : तुरीच्या भावाताल तेजी कायम आहे. सध्या तूर आवकेचा हंगाम आहे. एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते.

अनिल जाधव

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे. आयसीईवरील वायदे आज दुपारपर्यंत ८७.०२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज जवळपास ३७० रुपयांनी कमी झाले होते. एमसीएक्सवरील वायदे ५७ हजार ४२० रुपयांवर आले. तर बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम होती. बाजारांमध्ये कापसाला आजही सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान कायम होती. देशातील बाजारात कापूस विक्रीचा दबाव दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव निचांकी पातळीवरून वर येताना दिसत आहेत. पण भावात पाहीजे त्या प्रमाणात वाढ नाही. विशेष म्हणजे भाव सुधारण्यासाठी काही अनुकूल घटकही आहेत. पण मंदीचे वातावरण तयार झआले आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. देशातही सोयाबीनचे भाव ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनची आवकही टिकून आहे. त्यामुळे ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सध्या कांद्याच्या भावातील वाढ कायम आहे. कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून १ हजार ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होत आहे. त्यामुळे कांदा बाजाराला आधार मिळाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर गुजरातमधील आवक टिकून आहे. यामुळे भाववाढीवर दबाव दिसतो, असेही त्यांनी सांगितले. कांद्याच्या भावात सध्या तरी मोठी वाढ दिसत नाही. कारण पुढील काळात इतरही काही राज्यांमधील कांदा आवक वाढेल, असे कांदा बाजारातील अभ्यासक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.

तुरीच्या भावाताल तेजी कायम आहे. सध्या तूर आवकेचा हंगाम आहे. एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते. पण यंदा आफ्रिकेतून होणारी तूर आयात कमी आहे. त्यातच उत्पादन घटल्याने शेतकरीही मर्यादीत विक्री करत आहेत. यामुळे तुरीच्या भावाला चांगलाच आधार आहे. सध्या तुरीला देशात ९ हजार ते ९ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहीली तर हा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. चालू महिन्यापासून हळदीची बाजारातील आवक वाढणार आहे. पण यंदा हळद पिकाला यंदा कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला बाजारात ११ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो. पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

Flower Farming Success : अभ्यासपूर्ण गुलाबशेतीतून आर्थिक स्थैर्य, समाधानही

Nutrient Management: चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकासाठी पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

SCROLL FOR NEXT