Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : विदर्भातील काही बाजारांत तूरदर पुन्हा १२ हजारांवर

Tur Rate : गेल्या काही दिवसांपासून दबावात आलेल्या तुरीच्या दरात आता पुन्हा सुधारणा दिसत असून काही जिल्ह्यांमध्ये दर प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : गेल्या काही दिवसांपासून दबावात आलेल्या तुरीच्या दरात आता पुन्हा सुधारणा दिसत असून काही जिल्ह्यांमध्ये दर प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. अमरावती बाजार समितीमध्ये देखील तुरीच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात तुरीच्या दराने चांगलीच उसळी घेत दर १२ हजारांच्या पार गेले होते. त्यानंतर मात्र दरात सातत्याने घसरण अनुभवण्यात आली. शुक्रवारीही काही बाजार समित्यांमध्ये १२ हजार रुपयांपेक्षा कमी दराने तुरीचे व्यवहार होत आहेत.

यवतमाळ बाजार समितीत बुधवारी (ता. १५) तुरीचे दर १०४०० ते ११५७५ रुपयांवर होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यात प्रतिक्‍विंटल ३५० ते ४०० रुपयांनी सुधारणा होत दर १०९०० ते ११८९० रुपयांवर पोहोचले. त्याचवेळी चांदूर बाजार (जि. अमरावती) बाजार समितीत दरात सुधारणा अनुभवली गेली.

बुधवारी या बाजार समितीत ९००० ते ११८७० असा तुरीचा दर होता. त्यात दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता. १६) सुधारणा होत दर ९००० ते १२१०० रुपयांवर पोहोचले. शेगाव (जि. बुलडाणा) बाजार समितीत मात्र दर दबावातच असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. या ठिकाणी बुधवारी तुरीला १०००० ते ११५०० असा दर असताना गुरुवारी (ता. १६) यात घसरण होत दर ९५०० ते ११४०० रुपयांवर आले.

या ठिकाणी तुरीची आवक देखील जेमतेम ५५ ते ६० क्‍विंटलच्या घरात झाली. त्याचवेळी कारंजा (जि. वाशीम) येथील बाजारात तुरीची १२०० क्‍विंटल आवक झाली. या ठिकाणी दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले.

किमान १०७०० रुपये तर कमाल १२३५५ रुपये प्रतिक्विंटल असा दर तुरीला कारंजा (लाड) येथे मिळाला. दरातील सुधारणेमुळे बाजारात तूरही विक्रीसाठी अधिक आली होती, असे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी या बाजारात दर १२४०० रुपयांवर होते. त्या वेळी आवक ८०० क्‍विंटल इतकी झाली होती.

नागपूर बाजारातही तूर तेजीत

नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीचे दर मे च्या सुरुवातीला ९५०० ते ११५०० रुपयांवर होते. त्यानंतर दरात अल्पशी सुधारणा होत दर ११६५० रुपयांवर पोहोचले. दहा मेनंतर मात्र यात प्रतिक्‍विंटल ३०० रुपयांची वाढ होत दर ११८५० रुपयांवर पोहोचले. आता तुरीचे व्यवहार ९५०० ते १२००१ रुपयांनी होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

SCROLL FOR NEXT