Hingoli News : यंदा विविध कारणांनी अनेक भागांत तुरीची उत्पादकता घटली आहे. त्यामुळे बाजार समित्यांतील तुरीची आवक कमी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून तुरीचे दर ९५०० ते १२००० रुपयांच्या दरम्यान आहेत. दरात आणखीन तेजी येईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केलेली नाही.
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व सेनगाव बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर किमान ९५०० ते कमाल ११९०० रुपये राहिले. हिंगोली बाजार समितीत शुक्रवारी (ता.३) तुरीची ३५० क्विंटल आवक होती.
दर प्रतिक्विंटल किमान १११०० ते कमाल ११९०० रुपये, तर सरासरी ११५०० रुपये मिळाले. हिंगोली धान्य बाजारात एक दिवस आड तुरीची आवक घेतली जात आहे. सोमवारी (ता.२९) ३५० क्विंटल आवक असताना किमान ११००० ते कमाल ११९९० रुपये तर सरासरी ११४९५ रुपये दर मिळाले.
हिंगोली बाजार समिती अंतर्गत कन्हेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील उपबाजारपेठेत शुक्रवारी तुरीची ७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०८०० ते कमाल ११४०० रुपये, तर सरासरी १११०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२) ६२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०९०० ते कमाल ११३०० रुपये, तर सरासरी १११०० रुपये दर मिळाले.
मंगळवारी (३० एप्रिल) तुरीची ६२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०४०० ते कमाल ११२०० रुपये, तर सरासरी १०८०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २९) ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०८०० ते कमाल ११४०० रुपये, तर सरासरी १११०० रुपये दर मिळाले.
सेनगाव बाजार समितीत बुधवारी (ता.१) तुरीची (लाल) ३४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९५०० ते कमाल ११६०० रुपये, तर सरासरी ९९०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (३० एप्रिल) तुरीची (लाल) ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९६०० ते कमाल ११५०० रुपये तर सरासरी ९९०० रुपये दर मिळाले. सोमवारी (२९ एप्रिल) तुरीची ९६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९७०० ते कमाल ११५०० रुपये तर सरासरी ९९०० रुपये दर मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.