Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याचे दर टिकून

Bedana Rate : दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजारपेठेत बेदाण्याची आवक हळू हळू वाढू लागली आहे. उठावही वाढू लागला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजारपेठेत बेदाण्याची आवक हळू हळू वाढू लागली आहे. उठावही वाढू लागला आहे. दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १२० ते २०० रुपये असा दर मिळत आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत. येत्या काळात बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या तिन्ही बाजार समितीत दिवाळीसुट्टीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले आहेत. या तीनही बाजारात ५ ते ६ हजार टन बेदाण्याची आवक होत आहे. त्यापैकी ५० ते ६० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे. दिवाळीपूर्वी दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १२० ते २०० रुपये असा दर होता.

सुट्टीनंतर सौदे सुरू झाले त्यावेळी बेदाण्याची आवक थोडी मंदावली होती. परंतु त्यानंतर बेदाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर्जेदार बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. सध्या दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १२० ते २०० रुपये असा दर मिळत आहे. बेदाण्याचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गतवर्षीच्या हंगामातील ५० ते ६० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. बेदाण्याची मागणी असल्याने उठाव होत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामातील बेदाणा नवीन बेदाणा विक्रीस येण्यापूर्वी संपेल अशी शक्यता आहे. येत्या काळात बेदाण्याचे दर टिकून राहण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मिती होते. गेल्यावर्षीचा बेदाणा निर्मितीचा हंगाम तीन महिने चालला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून या परिसरातील बेदाणा शेडची दुरुस्ती, डागडुजी आणि स्वच्छतेची कामे सुरू करण्यासाठी बेदाणा शेड मालकांनी नियोजन केले आहे.

त्यानुसार परराज्यातील मजूर देखील या कामासाठी बोलावले आहेत. त्यामुळे यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरवात होण्याची शक्यता आहे. नवीन बेदाणा मार्केटमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येईल.

बेदाण्याचे प्रतवारीनुसार दर (प्रति किलोचे)

हिरवा...१२०-२००

पिवळा...१३०-१६०

काळा...३०-९५

यंदा बेदाणा निर्मितीच्या हंगामाची तयारी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. त्यासाठी मजूर दाखल होतील. त्यानंतर बेदाणा शेडची दुरुस्ती, डागडुजी आदी कामे पूर्ण केल्यानंतर हंगाम सुरू होईल.
- सुनील माळी, बेदाणा उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Center Strike: ‘साथी पोर्टल’ विरोधात सोमवारी विदर्भात कृषी केंद्रधारकांचा बंद

Vidhan Parishad Opposition Leader : सतेज पाटील विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते?

Heavy Rain Issue: उत्तरेकडील पावसाने केळी बाजाराला फटका

Fish Price: मासळीच्या दरात सुधारणा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीतील ‘सप्लाय व्हॅलिड’ एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT