Bedana Market : सौद्यांत बेदाण्याला उच्चांकी १३० ते १८० रुपये किलो दर

Dry Grapes : सौद्यांत ३४ गाड्यांतून ३४० टन बेदाणा आवक होऊन १७० टन विक्री झाली.
Bedana
Bedana Agrowon
Published on
Updated on

Sangli News : दिवाळीच्या सुट्टीनंतर सांगली बाजार समिती आवारात झालेल्या बेदाणा सौद्यांमध्ये उच्च दर्जाच्या बेदाण्याला उच्चांकी १३० ते १८० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. बुधवारी (ता. २९) सौद्यांत ३४ गाड्यांतून ३४० टन बेदाणा आवक होऊन १७० टन विक्री झाली. सुट्टीनंतरच्या पहिल्या सौद्यांत उत्साह दिसून आला असला तरी दर कमी होते.

Bedana
Bedana Market : बेदाणा सौदे सावळीला हलविण्यास व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचा विरोध

दिवाळीपूर्वी झालेल्या बेदाणा सौद्यांचे संपूर्ण पेमेंट पूर्ण व्हावे, व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी शून्य पेमेंटची संकल्पना जवळपास १५ वर्षांपासून राबवली जाते. ३० ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे बंद ठेवले होते.

या कालावधीत बेदाणा व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट पूर्ण केले. त्यामुळे बुधवारी दुपारी एक वाजता बाजार समितीच्या आवारातील बेदाणा सौदा हॉलमध्ये १७ दुकानांत बेदाणा सौदे झाले. देशभरातील सुमारे ५० ते ६० बेदाणा खरेदीदार सहभागी झाले होते.

पहिल्याच दिवशी ३४ गाड्यांतून ३४० टन बेदाणा आवक झाली होती. सौद्यांत चांगल्या उच्चप्रतीच्या बेदाण्यास १३० ते १८० रुपये प्रतिकिलो, तर मध्यम प्रतीच्या बेदाण्यास ४० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

Bedana
Bedana Market : सांगली बाजार समितीतील बेदाणा सौदे सावळीला हलविणार

राज्यात सध्या शीतगृहात शेतकऱ्यांचा ५० ते ६० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. आता बेदाणा सौदे सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर पाहून विक्री करण्याचे नियोजन सुरू केले आहे. नवीन बेदाणा मार्केटमध्ये येईपर्यंत गत वर्षीचा बेदाणा विक्री होईल.

बेदाण्याचे दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. सांगली बाजार समितीपाठोपाठ तासगाव बाजार समितीत शून्य पेमेंटनंतर गुरुवारी (ता. ३०) बेदाणा सौदे सुरू होणार आहेत, अशी माहिती तासगाव बाजार समितीचे सचिव यांनी दिली.

आवक कायम; दरात घसरण

दिवाळीपूर्वी हिरव्या बेदाण्यास १२० ते २२०, पिवळ्या बेदाण्यास १३० ते १८० तर काळ्या बेदाण्यास ३० ते ७० प्रतिकिलो दर होता. दिवाळीच्या सुट्टीनंतरचा बुधवारी पहिलाच सौदा असला तरी बेदाण्याची आवक दरवर्षीप्रमाणे आहे. मात्र दिवाळीपूर्वीपेक्षा बेदाण्याच्या दरात घसरण झाली आहे. पुढील सौद्यात बेदाण्याची मागणी आणि दरही वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली.

दिवाळीच्या सुट्टीनंतर बेदाण्याचा पहिला सौदा झाला. या सौद्यासाठी बेदाण्याची चांगली आवक झाली असून दर्जेदार बेदाण्यास चांगला दर मिळाला. शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीस बाजार समितीत घेऊन यावे.
- सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com