Bedana Market : बेदाणा सौदे सावळीला हलविण्यास व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचा विरोध

Bedana Auction : सांगली मार्केट यार्डातील बेदाणे सौदे सावळी (ता. मिरज) येथे स्थलांतरित करू नये, अशी मागणी होत आहे.
Bedana Market
Bedana Market Agrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली मार्केट यार्डातील बेदाणे सौदे सावळी (ता. मिरज) येथे स्थलांतरित करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्केट यार्डातील बेदाणा, अडत व व्यापारी, शिवसेनेचे नानासाहेब शिंदे व कानडवाडीचे माजी सरपंच अनिल शेंगुणशे यांनी सोमवारी (ता. ३०) निवेदनाद्वारे केली. सभापती सुजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Bedana Market
Bedana Market : सांगली बाजार समितीतील बेदाणा सौदे सावळीला हलविणार

स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सावळीतील जागा बेकायदा खरेदी केल्याबाबत तक्रार केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्या जागेमध्ये उच्चदाब विद्युत वाहिनी, मोठा नाला असून ती जागा एन.ए. नाही. शेतकरी निवास, दळणवळणाची सोय नाही. वाहनांची सोय नाही. काही मोजके व्यापारी स्वतः पैसे खर्च करून शेड बांधण्याची चुकीची भूमिका घेत आहेत. या भूमिकेस आमचा विरोध असल्याचे शेतकरी, व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी सांगितले. कानडवाडीचे माजी सरपंच अनिल शेंगुणशे यांनीसुद्धा बेदाणा मार्केट सावळी येथील बेकायदा जागेत हलवू नये, अशी भूमिका मांडली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मार्केट यार्डमधील बेदाणा अडत व व्यापार करणाऱ्या तब्बल तीसहून अधिक व्यापाऱ्यांनी बेदाणा सौदे हलविण्यास विरोध केला आहे. सावळीला बेदाणा सौदे हलविण्याऐवजी मार्केट यार्डातच सुसज्ज हॉल करावा, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली.

Bedana Market
Bedana Market : दसरा, दिवाळीमुळे बेदाणा दर टिकून

व्यापाऱ्यांचे हित पाहू नका : संजय खोलखुंबे

शेतकऱ्यांच्या जिवावरच सांगली मार्केट यार्ड चालत असताना त्यांच्यावर अन्याय करून व्यापाऱ्यांचे हित पाहिले जात आहे. बाजार समितीच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलखुंबे व तालुका अध्यक्ष सुरेश वसगडे यांनी यांनी दिला.

सावळीत दळणवळणासह सर्वच गैरसोय : शिंदे

शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नानासाहेब शिंदे म्हणाले, की मार्केट यार्डातील बेदाणे सौदे कोणा व्यक्तीसाठी बाहेर नेऊ नयेत. यार्डामध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांची सोय होत आहे. दळणवळणासह सर्वच गैरसोयी सावळी येथे आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तिथे जाणे शक्य नाही. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका. बेदाणा सौदे मार्केट यार्डतून बाहेर नेल्यास बाजार समितीचा कर चुकणार आहे. यामुळे बेदाणा सौदे मार्केट यार्डातच झाले पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com