Marigold Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Marigold Rate : झेंडूच्या फुलांनी दसऱ्याला खाल्ला भाव

चालू वर्षी अतिवृष्टी व संततधार पावसामुळे झेंडूच्या लागवडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. दसरा सणाच्या तोंडावर उत्पादन घटल्याचे बाजारात झेंडूच्या फुलांनी या वर्षी चांगलाच भाव खाल्ला आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : चालू वर्षी अतिवृष्टी (Heavy Rain) व संततधार पावसामुळे झेंडूच्या लागवडीचे (Marigold Cultivation) मोठ्या प्रमाणावर नुकसान (Marigold Crop Damage) झालेले आहे. दसरा सणाच्या तोंडावर उत्पादन (Marigold Production) घटल्याचे बाजारात झेंडूच्या फुलांनी (Marigold Flower Rate) या वर्षी चांगलाच भाव खाल्ला आहे.

मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी लागवडी केल्या होत्या; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात निर्बंध असल्याने अपेक्षित उठाव नव्हता. चालू वर्षी मागणी वाढल्याने दरात तेजी टिकून वाढल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील अनेक फूल उत्पादक शेतकरी दसरा व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ समोर ठेवून झेंडू लागवड करत असतात. नाशिक, कळवण, बागलाण, चांदवड, दिंडोरी, सिन्नर व निफाड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर लागवडी होतात. मागणी असल्याने चांगला दर मिळतो. चालू वर्षी शेतकऱ्यांना किलोमागे ३० ते ३५ रुपये अधिक दर मिळाल्याचे दिसून आले.

घाऊक बाजारात झेंडू ६० ते १०० रुपयांपर्यंत विक्री झाली. तर किरकोळ विक्रीत १०० ते १५० रुपयांपर्यंत दर होता. पिवळ्या आणि केशरी झेंडूला मागणी असल्याने चांगला दर राहिला. आवक असली तरी झेंडूच्या फुलांना प्रतवारीनुसार दर मिळाला. राजस्थानमधूनही झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने गुणवत्तापूर्ण दर्जाच्या फुलांना ४५० रुपये प्रतिक्रेट दर मिळाल्याची नोंद नाशिक फुलबाजारात झाली आहे.

नाशिक शहरात पंचवटी परिसरात वाहनांमधून चांदवड, सटाणा, निफाड, इगतपुरी, सिन्नर तालुक्यांसह संगमनेर येथून मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. थेट विक्रीत १५० ते २०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे झेंडू उत्पादकांनी विक्री केली. तर किरकोळ विक्रीत प्रतिक्रेट १ रुपये नगाप्रमाणे विक्री झाली.

चांदवड बाजारात आवक वाढली

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात लिलावाच्या पहिल्या दिवशी ७५० क्रेट तर दुसऱ्या दिवशी ३५०० क्रेट झेंडूच्या फुलांची आवक झाली. लाल झेंडूला प्रति क्विंटल १२५० ते ५००० सरासरी ४००० व पिवळ्या झेंडूला १८०० ते ५५०० सरासरी ४२०० रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT