Desi Ber Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Desi Ber : गावरान बोरांचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

Fruit Market : बोरांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात गावरान बोरांची आवक १० क्‍विंटलवर पोहोचली आहे.

Team Agrowon

Amaravati News : बोरांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात गावरान बोरांची आवक १० क्‍विंटलवर पोहोचली आहे. ग्रामीण भागात शेताच्या बांधावर असलेल्या झुडपाची बोर जमा करून ती बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. अमरावतीच्या फळ, भाजीपाला बाजारात याला चांगला दर मिळत असून याद्वारे उत्पन्नाचा हंगामी स्रोतही उपलब्ध झाला आहे.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात गावरान बोरांना १००० ते २००० रुपयांचा दर मिळत असून, जानेवारी अखेरपर्यंत बोरांची उपलब्धता होणार आहे. थंडीच्या दिवसांत साधारणतः दिवाळीपासूनच बोरांची आवक बाजारात सुरू होते.

शेताच्या धुऱ्यावर बोर तोडून किंवा खाली पडलेली बोर फळ संकलित करून ती विक्रीसाठी आणली जातात. सध्या या बोरांना चांगली मागणी असून, घाऊक बोरांची खरेदी करून ती किरकोळ विक्री करणाऱ्यांना दिली जातात.

कमीत कमी १००० तर जास्तीत जास्त २००० रुपये आणि सरासरी १४०० रुपयांचा दर गावरान बोरांना मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून गावरान बोरांची आवक मात्र सातत्याने कमी होत असल्याचे सांगण्यात आले.

गावरान बोरांची आवक सुरुवातीच्या काळात २५ ते ३० क्‍विंटलपर्यंत होती. आता ती कमी होऊन १० क्‍विंटलवर आली आहे. ही आवक नियमित असून, जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही आवक होत राहील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

चुरी (लहान) संत्रा फळांची मोठी आवक

अमरावती बाजारात चांगल्या प्रतीच्या नसल्या तरी चुरी (लहान आकाराची फळे) संत्र्याची आवक नियमित होत आहे. सध्या चुरी फळांची आवक १५० क्‍विंटलवर आहे. या फळांचा प्रक्रियेकामी वापर होतो.

या प्रतीच्या फळांना १५०० ते २००० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. चुरी फळांचे दर वाढल्यास प्रक्रियाजन्य पदार्थाचे दरही वाढतात. परिणामी, त्याच्या बाजारावर परिणाम होतो. त्यामुळे चुरी फळ कमी असावे, अशी अपेक्षा प्रक्रिया उद्योजकांची राहते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Water Storage: सोलापूर जिल्ह्यातील तलावांत ठणठणाट; रब्बीची चिंता वाढली

Farmers Protest: कृषिमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Raiwat Fad Weir: रायवट फड लाभक्षेत्राला पर्यायी पाण्याची मागणी

Umed Mall: सांगली जिल्ह्यास ‘उमेद मॉल’ मंजूर

Women Farmer Certificate: प्रत्यक्ष शेतीकामे करणाऱ्या महिलांना ‘शेतकरी प्रमाणपत्र’

SCROLL FOR NEXT