Dragon Fruit : रामेश्वर आंबा संशोधन उपकेद्र प्रक्षेत्रावर ड्रॅगनफ्रूट लागवडीचा प्रयोग

Dragon Fruit Cultivation : देवगड येथील रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्राच्या प्रक्षेत्रावर १ एकरमध्ये ड्रॅग्रनफ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पहिल्याच वर्षी या लागवडीतून उत्पादन मिळाले आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : देवगड येथील रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्राच्या प्रक्षेत्रावर १ एकरमध्ये ड्रॅग्रनफ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पहिल्याच वर्षी या लागवडीतून उत्पादन मिळाले आहे. संशोधन संस्थेने यशस्वी लागवड केल्यामुळे कोकणातील वातावरणात ड्रॅगनफ्रुट लागवड करण्यास संधी मिळणार असून आंबा लागवडीच्या सुरुवातीला आतंरपीक म्हणून उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना वाव आहे.

कोकणातील वातावरण आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंदे यासह काही पारंपरिक पिकांसाठी पोषक असे म्हटले जायचे. परंतु वातावरणातील बदलामुळे आंबा, काजू ही पिके गेल्या काही वर्षांपासून संकटात सापडल्याचे चित्र आहे. वातावरणातील बदलानुसार पीक बदल किवा आंतरपिकांचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा संशोधन संस्थांचा प्रयत्न सुरू आहे.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट अन् शेडनेटचा यशस्वी प्रयोग

दरम्यान आंबा पिकावर संशोधन करणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोलीच्या देवगड येथील रामेश्वर आंबा संशोधन उपकेंद्राच्या प्रक्षेत्रावर ड्रॅगनफ्रुट लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

या संशोधन केंद्राच्या १ एकर प्रक्षेत्रावर सप्टेंबर २०२२ मध्ये ड्रॅगनफुटच्या जम्बो रेड, जम्बो व्हाईड, श्रीलंकन व्हाईट, श्रीलंकन रेड अशा चार जातींची लागवड करण्यात आली. चार बाय तीन मीटर अंतरावर सिमेंट खांब उभे करण्यात आले. त्यावर चौकोनी रिंग करण्यात आली. साधारणपणे एका सिमेंट खांबाभोवती चार रोपांची लागवड करण्यात आली.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : काबाडकष्टाच्या शेतीत ‘ड्रॅगनफ्रूट’ ने दाखवला मार्ग

लागवडीकरिता रोपे सांगली आणि बारामतीमधून प्रतिरोप ४० रुपयांनी खरेदी करण्यात आली. जून २०२३ मध्ये या लागवडीतून उत्पादन सुरू झाले. पहिल्याच वर्षी ४५ ते ५० किलो उत्पादन मिळाले.

आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वरच्या प्रक्षेत्रावर आम्ही ड्रॅगनफूटची लागवड केलेली आहे. त्यातून दर्जेदार उत्पादनदेखील मिळाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रयोगासाठी कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक, डॉ. शिनगारे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले.
डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ,आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com