Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याचे दर टिकून

Sangli Bedana Market : गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. रक्षाबंधन, गणपती आणि जन्माष्टमी या सणांनिमित्त देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदी सुरु झाली आहे.

Abhijeet Dake

Sangli News : गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. रक्षाबंधन, गणपती आणि जन्माष्टमी या सणांनिमित्त देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदी सुरु झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत खरेदीसाठी मोठी लगबग सुरु होईल. सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात वाढ होईल, अशी शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

राज्यात बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आवक आणि उठावही कमी अधिक होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून असल्याने बेदाणा उत्पादकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

राज्यात सुमारे ३ लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत सुमारे ४० टक्के बेदाण्याची विक्री झाली आहे. तर ६० टक्के बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे, अशी माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या चार महिन्यांत रक्षाबंधन, श्रावण, गणपती, गोकूळ अष्टमी, दसरा, दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे या सणांच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची खरेदी पंधरा ते वीस दिवस अगोदर केली जाते.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात श्रावण, रक्षाबंधन, गणपती हे दोन उत्सव आले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून बेदाणा खरेदीसाठी देशभरातील व्यापारी सक्रिय झाले आहेत.

हंगामाच्या सुरुवातीपासून दरात चढ-उतार होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री करण्याचे थांबविले होते. दरम्यान, त्यानंतर उत्सवाच्या खरेदीसाठी आत्तापासून व्यापारी नियोजन करत आहेत.

शिल्लक बेदाण्यापैकी सुमारे ३० ते ४० टक्के बेदाण्याची विक्री होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक शेतकरी सणांनिमित्त बेदाणा विक्रीसाठी थांबले आहेत. सध्या सण, उत्सव तोंडावर आले आहेत. त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीचे नियोजन करू लागला आहे.

चांगल्या प्रतीचा बेदाणा ः १५० ते २१०

दोन प्रतिचा बेदाणा ः ९०ते १५० पर्यंत

यंदा बेदाण्याचे उत्पादन वाढले आहे. दरात चढ-उतार झाले. सध्या दर टिकून आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर दर चांगला मिळतो. आम्ही दरवर्षी गणपती सणानिमित्त बेदाणा विक्री करण्याचे नियोजन करत असतो. यंदाही गणपती सणाला बेदाणा विक्री करणार आहे. दरही चांगले मिळतील, अशी अपेक्षा आहे.
- राहुल सावळे, बेदाणा उत्पादक, हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT