Raisin Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : बेदाण्याचे दर टिकून; निम्मा हंगाम उरकला

बेदाणा निर्मितीचा हंगाम ५० टक्के उरलका आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Raisin Market Update सांगली ः बेदाणा निर्मितीचा (Raisin Production) हंगाम ५० टक्के उरलका आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर (Raisin Rate) टिकून आहेत. सध्यातरी बेदाण्याच्या दरात तेजी-मंदी नसल्याचे चित्र आहे. शेतकरी बाजारातील

दराचा अंदाज घेत असून विक्रीसाठी पुढे येत आहेत. बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २१० रुपये दर मिळत आहे. आतापर्यंत सांगली आणि तासगाव भागातील शीतगृहात ६० टक्के बेदाणा शेतकऱ्यांनी ठेवला आहे, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली.

राज्यातील बेदाण्याच्या हंगाम मध्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही प्रमामात बेदाण्याचा दर्जा घसरला आहे. परंतु सध्या बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याच्या दरात चढउतार राहिला आहे. गेल्या महिन्यात दोन वेळा बेदाण्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीऐवजी शीतगृहात ठेवण्यासाठी पसंती दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

सांगली आणि तासगाव या भागात सुमारे ८० हून अधिक शीतगृहे आहेत. या शीतगृहात प्रामुख्याने बेदाणा ठेवला जातो. दराची स्थिती पाहून शेतकरी वर्षभर बेदाण्याची विक्री करतो. यंदाच्या हंगामात या दोन्ही भागांतील शीतगृहात ६० टक्के शेतकऱ्यांनी बेदाणा ठेवला आहे. ४० टक्के शीतगृहात बेदाणा ठेवण्यासाठी जागा शिल्लक आहे.

हंगाम एप्रिलपर्यंत चालणार

यंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाणा निर्मितीस गती आली आहे. आतापर्यंत समारे ५० टक्के हंगाम आटोपला आहे. या वर्षीचा हंगाम एप्रिलअखेर चालणार अशी शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे. एप्रिलच्या मध्यावर राज्यात बेदाण्याचे उत्पादन किती होईल, याचा अंदाज येईल.

गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. सांगली, तासगाव या दोन्ही ठिकाणच्या शीतगृहात ६० टक्के बेदाणा शेतकऱ्यांनी ठेवला आहे. यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम एप्रिलअखेर सुरू राहील. त्यानंतर बेदाण्याचे उत्पादन किती झाले याचा अंदाज बांधता येईल.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.

बेदाणा दर प्रतिकिलो

हिरवा बेदाणा - १५० ते २१०

पिवळा बेदाणा - १५० ते १९०

काळा बेदाणा - ३० ते ६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT