Jalana News: अंबड तालुक्यातील शहागड परिसरातील बळेगाव, आपेगाव, गोरी, गंधारी, डोमलगाव, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बुद्रुक आणि साष्टपिंपळगाव या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे होत्याचे नव्हते झाले असून, लागवडीचा खर्चही वसूल होईना अशी स्थिती आहे..सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्यात गेले. कपाशीच्या बोंडांना सड लागली, तर तुरीचे पीक उबळले आहे. अनेक शेतांमध्ये कापूस फुटलेला दिसत असला तरी ओलाव्यामुळे बोंडे काळी पडली आहेत. परिणामी ‘पांढरे सोनं’ आता ‘काळे सोनं’ बनले असून शेतकरी हतबल झाले आहेत..Cotton Crop Management: कपाशीच्या पातेगळच्या व्यवस्थापनासाठी उपाय.खरीप हंगामात झालेल्या खर्चाची भरपाईही न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, सडलेल्या कापसाच्या वेचणीसाठी आणि निवड प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मजुरीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे वाढले आहे..Monsoon Cotton Crop Management : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्यावयाची काळजी .तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जिकडे- तिकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे खरीप हंगामाची पुरती वाट लागली आहे. तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे हाती काहीच उरले नाही. केलेला खर्च कसा वसूल करावा. -विलास, टोपे, ग्रामस्थ, गोरी.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे अद्याप शासनाकडून करण्यात आलेले नाही. शासन नुकसानीचे पंचनामे करणार कधी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार तरी कधी? दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. - अर्जुन काटकर, ग्रामस्थ, पाथरवाला बुद्रुक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.