Raisin Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Production : यंदा २ लाख ३० हजार टन बेदाणा उत्पादनाचा अंदाज

राज्यातील बेदाणा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून यंदाच्या हंगामात सुमारे २ लाख २० ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News राज्यातील बेदाणा हंगाम (Raisin Season) अंतिम टप्प्यात आला असून यंदाच्या हंगामात सुमारे २ लाख २० ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन (Raisin Production) होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. येत्या काळातही दर टिकून राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील (Raisin Industry) जाणकारांनी व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी राज्यात १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. राज्यात सर्वाधिक बेदाणा सांगली जिल्ह्यात तयार होतो. यंदा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. सुरुवातीच्या काळात बेदाणा निर्मितीला गती नव्हती. त्यानंतर गती आली.

यंदाच्या हंगामात द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने टेबल ग्रेप्सपासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा बेदाणा निर्मितीकडे कल वाढला आहे. सांगलीसह अन्य ठिकाणी बेदाणा निर्मितीसाठी धांदल सुरू झाली आहे.

Raisinयंदा कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह इतर भागातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्याचे काम सुरू आहे.

सध्या बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. एप्रिलअखेर बेदाणा निर्मिती सुरू राहील, अशी शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या हंगामात सुमारे २ लाख २० हजार ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ४० ते ५० हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन वाढेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

निसर्गाची साथ

वास्तविक पाहता, बेदाणा हंगाम सुरू झाला की वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. त्यामुळे बेदाण्याचे मोठे नुकसान होते. यंदा पाऊस झाला नाही.

त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. यंदा जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीच्या पट्ट्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे बेदाण्याचा दर्जा घसरला आहे. बेदाणा काळा पडला आहे. बेदाणा निर्मितीला निसर्गाची साथ मिळाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समानाधाचे वातावरण आहे.

बेदाणा दर प्रति किलो

हिरवा बेदाणा ः १५० ते २००

पिवळा बेदाणा ः १५० ते १९०

काळा बेदाणा ः ३० ते ६०

बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Election Result: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांची 'शिट्टी' वाजली, मुश्रीफांनी निकाल स्वीकारला

Mosambi Farming : पोपटांच्या थव्यांचा मोसंबी बागांवर डल्ला!

Water Conservation : दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे

Sugarcane FRP Price : अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर करा

Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी

SCROLL FOR NEXT