Crop Damage : वरुड, जि. अमरावती निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता पोपटांच्या उपद्रवाचे नवे संकट उभे राहिले आहे. बागांखाली फळांचा सडा पडत असून, पोपटांना हाकलण्यासाठी फटाके, ढोल, ध्वनिक्षेपक आणि अन्य उपाय करूनही उपयोग होत नसल्याने डोळ्यादेखत मोठे नुकसान होत असल्याने उत्पादक हतबल झाले आहेत..वरुड-मोर्शी तालुका मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर मोसंबीच्या बागा उभारल्या आहेत. यंदा उन्हाचा तीव्र तडाखा, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या संकटातून बागा सावरत असतानाच पोपटांच्या थव्यांनी उत्पादकांची चिंता वाढवली आहे..Cyclone Damage Insurance : वादळात नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत संभ्रम.आंबिया बहारातील फळे पुढील महिन्यापासून परिपक्व होऊन विक्रीसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा असताना, पोपटांच्या उपद्रवामुळे हातातोंडाशी आलेले उत्पादन वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हातूर्णा, बेलोरा (ताथोडे), भापकी, नांदगाव, आलोडा, गाडेगाव, राजूरा बाजार, अमडापूर, मोरचूंद, चिंचरगव्हाण, वंडली आणि वघाळ परिसरातील मोसंबी बागांमध्ये हा प्रकार आढळून येत आहे..Crop Damage: उन्हाच्या तडाख्याने पिके करपली; मदतीच्या दुसऱ्या यादीतही मुळशी तालुका वगळला!.पोपटांचे थवे एकाच वेळी बागांमध्ये उतरतात. फळांवर टोचा मारल्यामुळे ती झाडावर टिकत नाहीत. अनेक झाडांखाली शेकडो फळे गळून पडलेली दिसत आहेत. या फळांना बाजारात विक्रीयोग्य मूल्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ती शेताच्या बांधावर टाकून द्यावी लागत आहेत..आधीच वाढता कृषी निविष्ठांचा खर्च, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि शेतमालाला मिळणाऱ्या दराचे संकट यामुळे मोसंबी उत्पादक आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच फळे विक्रीसाठी तयार होण्याच्या टप्प्यावर पोपटांकडून नुकसान होत असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या नव्या संकटामुळे मोसंबी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे..बंदोबस्तासाठी दिवसभर शेतात हजेरीपोपटांचा उपद्रव रोखण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या वापरत आहेत. फटाके फोडणे, ढोल वाजविणे, ध्वनिक्षेपकावर मोठ्या आवाजात ध्वनी करणे, तसेच कडू कीटकनाशकांचा वापर करून पोपटांना दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या उपायांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याने पोपट पुन्हा बागांमध्ये येऊन फळांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात थांबून पोपटांना हाकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी, बागेतील अन्य कामांसह शेतीच्या दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे..‘‘यंदा हातूर्णा, बेलोरा, भापकी आणि आलोडा परिसरातील शेतशिवारांत पोपटांकडून फळांचे नुकसान होण्याचा हा प्रकार दिसत आहे. हाती आलेली फळे डोळ्यांदेखत गळून पडत असल्याने लाखोंचे नुकसान होत आहे. पोपटांना हाकलण्यासाठी शेतीची इतर कामे बाजूला ठेवून सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात थांबावे लागत आहे.’’- प्रदीप ताथोडे, मोसंबी उत्पादक शेतकरी, बेलोरा (ताथोडे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.