Raisin Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Rate: बेदाण्याचे दर स्थिर

Raisin Market: राज्यात यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असून उठावही होत आहेत. बेदाण्याचे दर स्थिर आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: राज्यात यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असून उठावही होत आहेत. बेदाण्याचे दर स्थिर आहेत. दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस २०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. आतापर्यंत ५० हजार टन बेदाण्याची विक्री झाली असून, ९० हजार ते १ लाख टन बेदाणा शिल्लक आहे, असा अंदाज बेदाणा उद्योगागीत जाणकारांनी व्यक्त केला आहे.

राज्यात गतवर्षी सुमारे २ लाख ८४ हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १ लाख ३४ हजार टन उत्पादन घटले आहे. हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याचे दर टिकून होते. मार्च महिन्यात सांगली, तासगाव या दोन्ही बाजार समितीत ६०० टनांची आवक होत होती,

तर पंढरपूर बाजार समितीत २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. या दरम्यान, बेदाण्याला प्रति किलोस ७० रुपयांपासून २२५ रुपयांपर्यंत असा दर होता. त्यानंतर बेदाण्याची मागणी वाढली. त्यामुळे बेदाण्याच्या दरात वाढ झाली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस ५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंदाजे ३० हजार टन बेदाण्याची विक्री झाली होती. त्यानंतर अर्थात मेच्या मध्यापर्यंत २० हजार टन बेदाणा विकला गेला. अर्थात, मे महिन्याच्या मध्यापर्यंत ५० हजार टन बेदाणा विक्री झाली असल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यापासून बाजारात बेदाण्याची आवक मंदावली आहे. सद्यःस्थिताला सांगली आणि तासगाव बाजार समितीत प्रत्येक सौद्याला ४०० टन बेदाण्याची आवक होते, तर पंढरपूर बाजार समितीत आठवड्यातून एका सौदा होतो. या सौद्याला २५० टन बेदाणा विक्रीसाठी येतो.

दर टिकून राहण्याची शक्यता

सद्यःस्थिताला शीतगृहात ९० हजार ते १ लाख टन बेदाणा शिल्लक आहे. बाजारात बेदाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे सध्या मागणीनुसार शेतकरी बेदाणा विक्रीचे नियोजन करत आहेत. दर चांगले मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पन्नास टक्के बेदाण्याची विक्रीही केली आहे. बेदाण्याचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

बेदाण्याचे दर प्रति किलोत

हिरवा बेदाणा २३० ते ३००

पिवळा बेदाणा २०० ते २५०

काळा बेदाणा ५० ते ११०

सध्या बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असली, तरी उठाव होत आहेत. त्यामुळे बेदाण्याचे दर स्थिर आहेत. बेदाण्याचे दर टिकून राहतील.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ashadhi Wari Air Ambulance : आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत प्रारूप यादीला स्थगिती

Turmeric Yellow Leaves: हळद पिकाची पाने पिवळी पडण्यामागील कारणे आणि उपाय

Rasta Roko Agitation : सौंदाळे येथे पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

Pandharpur Wari Special : वारकऱ्यांच्या परतीसाठी पावणेचारशे एसटी गाड्या

SCROLL FOR NEXT