Green Chili Pune Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chili Market : बांगलादेशची मागणी वाढल्याने दर्जेदार मिरची ७००० रुपयांवर

Chili Rate : गेल्या पंधरवाड्यात हिरव्या मिरचीला उच्चांकी ७००० ते ७५०० रुपयांचा दर मिळाला होता. आता मात्र ३५०० ते ४००० रुपयांवर मिरचीचे दर आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : आवक स्थिर असतानाही स्थानिकस्तरावर हिरव्या मिरचीचे दर दबावात आले आहेत. गेल्या पंधरवाड्यात हिरव्या मिरचीला उच्चांकी ७००० ते ७५०० रुपयांचा दर मिळाला होता.

आता मात्र ३५०० ते ४००० रुपयांवर मिरचीचे दर आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. बांगलादेशची मागणी असलेल्या चांगल्या प्रतीच्या मिरचीचा दर मात्र ७००० रुपयांवर टिकून आहे.

कळमना बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा व तत्सम भागातून देखील भाजीपाला आवक होते. त्यामध्ये हिरव्या मिरचीचा देखील समावेश आहे. दरात तेजी असल्यास ही आवक वाढती राहते.

कळमना बाजारातील व्यापारी, अडत्यांशी संपर्क साधत त्यांच्या माध्यमातून दराबाबत विचारणा केली जाते. त्यानंतर शेतकरी आपला शेतीमाल बाजारात पाठवितात. असे असले तरी गेल्या महिनाभरापासून हिरव्या मिरचीची सरासरी आवक ४०० क्‍विंटलच्या घरात आहे.

जुलैच्या सुरुवातीला हिरव्या मिरचीच्या दरात चांगलीच तेजी अनुभवली गेली. ६००० ते ६५०० आणि त्यानंतर ७००० ते ७५०० रुपयांवर मिरचीचे दर पोहोचले होते. ९ जुलैपर्यंत दरातील ही तेजी कायम असताना त्यानंतर मात्र आवक स्थिर तर दर दबावात असल्याचे चित्र आहे. त्यानंतरच्या काळात ४००० ते ४५०० असा दरही मिरचीला मिळाला. सद्यःस्थितीत ३५०० ते ४००० रुपयांनी मिरचीचे व्यवहर होत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील राजूरा बाजार हिरव्या मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात रात्रीच्यावेळी मिरचीची आवक होत त्याच वेळी लिलाव प्रक्रिया पार पाडत चुकारे केले जातात. या भागातील उत्पादित मिरचीची आवक १५ ऑगस्टनंतर होते. त्यानंतर या बाजारातील उलाढाल होणार असल्याचे व्यापारी मुन्ना चांडक यांनी सांगितले.

या भागात खरेदी केलेली मिरची ही थेट बांगलादेशला निर्यात केली जाते. बांगलादेश हा हिरव्या मिरचीचा मोठा खरेदीदार असल्याचे श्री. चांडक यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये पावसाच्या परिणामी त्या भागातील मिरची पीक खराब झाले. त्यामुळे देखील बांगलादेशची मागणी असल्याने दर तेजीत राहतात.

अमरावती बाजारात २६०० रुपयांचा दर

कळमना बाजार समितीनंतर मोठी बाजार समिती असलेल्या अमरावती फळ व भाजीपाला बाजारातदेखील हिरव्या मिरचीची नियमित आवक होत आहे. सद्यःस्थितीत ती अवघी ४० क्‍विंटलच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी हिरव्या मिरचीला २६०० ते ३००० रुपयांचा दर मिळत आहे.

सध्या केवळ बुलडाणा भागातील मिरचीची आवक कळमना व अमरावती बाजारात होत आहे. यातील चांगल्या प्रतीच्या मिरचीची निर्यात बांगलादेशला होते. त्याला सरासरी ७० रुपये किलो (७०००० रुपये प्रतिक्‍विंटल) असा दर मिळत आहे. प्रत असेल तर दर चांगला मिळतो. प्रतनुसार दर निश्‍चिती होते. बांगलादेशमध्ये पावसाच्या परिणामी त्या भागातील मिरचीला फटका बसला आहे.
- मुन्ना चांडक, व्यापारी, राजूरा बाजार, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT