Pune News: राज्यातील भूकरमापकाच्या भरतीमधील संभ्रम दूर झाला असून परीक्षेचा निकाल ३० जानेवारीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेत भाग घेतला असून, निकाल लांबल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे..भूमि अभिलेख विभागाने गट क भूकरमापक संवर्गाच्या ९०३ जागांसाठी सरळसेवा भरतीची प्रक्रिया चालू केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांस्तव भरती रखडलेली आहे. भूमी अभिलेख विभाग किंवा राज्य शासनाच्या यंत्रणांवर वशिलेबाजीचा आरोप होऊ नये यासाठी ‘आयबीपीसएस’ या त्रयस्त यंत्रणेमार्फत परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतल्या होत्या. परंतु परीक्षेनंतर महिना उलटूनही निकाल जाहीर केला जात नसल्यामुळे उमेदवार अस्वस्थ झाले होते..Bribery Case: दीड लाखाची लाच घेताना भूकरमापकाला अटक.जमाबंदी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की ९०३ जागांसाठी राज्यातून ३४ हजार ५३२ अर्ज आले होते. परंतु प्रत्यक्षात ऑनलाइन परीक्षा यातील केवळ ३० हजार ६६५ उमेदवारांनीच दिली आहे. पुढील आठवड्यात शुक्रवारी (ता. ३०) या परीक्षेचा निकाल https://mahabhumi.gov.in/ संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. तसेच संबंधित जमाबंदी उपसंचालकांच्या कार्यालयातदेखील निकाल उपलब्ध असतील..MPSC Exam Postponed: २१ डिसेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली.एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आल्या आहेत. भूकरमापकांची भरती रखडल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. भरती होताच प्रत्येक जिल्ह्यासाठी जमीन मोजणीकरिता नव्या जमीन मोजणीयंत्रांसह आता नव्या दम्याचे मनुष्यबळदेखील मिळणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील शेतकऱ्यांना भूमी अभिलेखविषयक सेवा जलदरीत्या मिळण्यास मदत होईल. जमाबंदी आयुक्तालयातील आणखी एका दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले, की निकाल जाहीर करण्यास उशीर झालेला आहे. तथापि, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेतली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.