Turmeric Cultivation  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Cultivation : हळद क्षेत्र घटीचा अंदाज

Turmeric Market : हळदीचे दर घसरल्याने त्याचा परिणाम हळदीच्या बियाण्यांवर झाला आहे. यंदा बियाण्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे चित्र आहे.

अभिजीत डाके

Sangli News : हळदीचे दर घसरल्याने त्याचा परिणाम हळदीच्या बियाण्यांवर झाला आहे. यंदा बियाण्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे चित्र आहे. परिणामी बियाण्यांच्या दरात प्रतिक्विंटलला १२०० ते १३०० रुपयांनी घट झाली आहे.

यंदा बियाण्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या हंगामात देशात हळदीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

सांगली बाजार समितीत दरवर्षी हळदीचे दर्जेदार बियाणे विक्रीसाठी येते. सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेडसह कर्नाटक, देशातील हळद उत्पादक या ठिकाणाहून हळदीचे बियाणे खरेदी करण्यासाठी येतात.

त्यामुळे बाजार समितीत दरवर्षी सुमारे ७०० (एका गाडीत १६ टन बियाणे) गाड्यांहून अधिक हळद बियाणे विक्रीस येते. प्रत्येक हंगामात ४०० ते ५०० गाडी हळद बियाणे विक्री होते. गेल्यावर्षी हळदीच्या बियाण्याचा दर प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये असा दर होता. गेल्या हंगामात ४०० ते ५०० गाड्या म्हणजे ६४०० ते ८००० टन बियाण्यांची विक्री झाली होती.

हळदीला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी हळद लागवड करण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे सांगली बाजार समितीत हळदीच्या बियाण्यांचा खप झाला नाही. बियाण्याच्या दरावरही सध्या परिणाम झाला आहे.

सध्या हळदीचे बियाणे २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या ५ ते ६ गाड्या म्हणजे ८० ते ९६ टन इतकेच बियाणे विक्री झाले आहे. यंदाच्या हंगामात ५० टक्क्यांपेक्षाही बियाण्यांची विक्री होईल, असा अंदाज बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

हळद उत्पादकांना फटका

यंदाच्या हंगामातील हळद लागवड सुरु झाली असल्याने बाजार समितीत हळदीचे बियाणे विक्रीस आले आहे. सध्या २०० गाड्यांहून अधिक विक्रेत्यांनी बियाणे आणले आहे. मात्र, हळद विक्रीचा हंगाम सुरु झाल्यापासून दरात फारशी तेजी नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका हळद उत्पादकांना बसलाच आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हळदीच्या दरात घसरण होत असल्याने हळद उत्पादकांनी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. यंदाच्या हंगामात बियाण्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. परिणामी बियाण्याचे दरही कमी झाले आहेत.
- कलंदर मकानदार, हळद बियाणे विक्रेते, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

SCROLL FOR NEXT