Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production : देशात ३४४ लाख कापूस गाठींचे उत्पादन

यंदाच्या हंगामात पावसाची संततधार, अतिवृष्टी या कारणांमुळे कापसाची उत्पादकता प्रभावीत होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. परंतु कॉटन ‘सीएआय’ने यंदा कापसाची स्थिती चांगली असल्याचा दावा केला आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः राज्यात कापसाच्या दराने (Cotton Rate) ९ हजारांचा टप्पा पार करीत दहा हजार रुपयांकडे वाटचाल केली आहे. त्यातच सोमवारी (ता. १४) झालेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएआय) २३ सदस्यीय बैठकीत कापसाची उत्पादकता (Cotton Productivity) पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच ३४४ लाख गाठी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात पावसाची संततधार, अतिवृष्टी या कारणांमुळे कापसाची उत्पादकता प्रभावीत होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. परंतु कॉटन ‘सीएआय’ने यंदा कापसाची स्थिती चांगली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच हंगामाच्या अखेरीस ३४४ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज वर्तविणाऱ्या ‘सीएआय’ने आपल्या दुसऱ्या बैठकीत चर्चेअंती पूर्वीसारखीच स्थिती कायम असल्याचे सांगत ३४४ लाख गाठींवरच शिक्‍कामोर्तब केले आहे.

दरम्यान, उत्तरेत उत्पादनाला काहीसा फटका बसत २.५० लाख गाठींची उत्पादकता कमी होण्याचा अंदाज आहे. ५० लाख गाठींवरून ४७.५० लाख गाठी इतके उत्पादन या भागात होईल. परंतु हे घटलेले उत्पादन गुजरात राज्यात भरून निघणार आहे. गुजरातमध्ये पूर्वीच्या ९१.०० लाख गाठींवरून २.५० लाख गाठींची वाढ होत उत्पादकता ९३.५० लाख गाठींवर पोहोचेल, असेही सांगण्यात आले.

राज्यनिहाय गाठींचे उत्पादनाचा अंदाज (लाख/गाठी)

पंजाब ः ४.५०

हरियाना ः १४.५०

राजस्थान वरचा भाग ः १७.३३

राजस्थानचा खालील भाग ः ११.३३

संपूर्ण उत्तर ः ४७.५०

-

गुजरात ः ९३.५०

महाराष्ट्र ः ८४.५०

मध्य प्रदेश ः २०.००

एकूण मध्य प्रांत ः १९८.००

-

तेलंगणा ः ४५.००

आंध प्रदेश ः १६.००

कर्नाटक ः २५.००

तमिळनाडू ः ०६.००

संपूर्ण दक्षिण ः ९२.००

-

ओडिशा ः ०३.००

अन्य ः ०३.५०

एकूण ः ३४४ लाख गाठी

शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. त्यातच पावसामुळे हंगाम लांबल्याने अनेक ठिकाणी कापसाची वेचणी झाली नाही. या दोन्ही कारणांमुळे बाजारात कापूस उशिरा दाखल होत असल्याने कापसाची आवकच मुळात कमी आहे. त्यामुळे दर वधारले आहेत. शेतकऱ्यांना गेल्या हंगामाप्रमाणे १२ हजार रुपये क्‍विंटल दर हवा आहे. त्यामुळे देखील त्यांनी कापसाचा साठा करून सोयाबीन व इतर शेतीमाल बाजारात आणत त्यातून गरजेपुरता पैसा उभा केला आहे.
ॲड. सुधीर कोठारी, सभापती, बाजार समिती, हिंगणघाट, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT