Chana Rate
Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : हमीभावाने दीड लाख क्विंटलवर हरभरा खरेदी

Team Agrowon

Chana Market Update परभणी -हिंगोली जिल्ह्यांत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत यंदा हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) १ लाख ५९ हजार ४९९ क्विंटल हरभरा खरेदी (Chana Procurement) करण्यात आला आहे.

त्यापैकी ४५ हजार ३८८ क्विंटल हरभऱ्याचे २४ कोटी २१ लाख ४९ हजार ७८१ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाच्या वतीने (नाफेड) राज्य सहकारी पणन महासंघाच्या केंद्रांवर खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी २ हजार ८०३ शेतकऱ्यांना ४५ हजार ३८८ क्विंटल हरभऱ्याचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

गुरुवार (ता.२०) पर्यंत या दोन जिल्ह्यांतील १८ केंद्रांवर नोंदणीकृत ३१ हजार ३४८ शेतकऱ्यांपैकी १० हजार ३९ शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केला.

राज्य सहकारी पणन महासंघा अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर १८ हजार ७०६ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. सर्व केंद्रांवर मिळून ४ हजार ५२१ शेतकऱ्यांकडून ७२ हजार ४४८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ११ हजार ५४ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे.

सर्व केंद्रांवर मिळून ५ हजार २६२ शेतकऱ्यांकडून ८२ हजार ५५३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील केंद्रांवर १ हजार ५८८ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. त्यापैकी २५६ शेतकऱ्यांचा ४ हजार ४९८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यासाठी खरेदी केलेला हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठवणे आवश्यक आहे. परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील ३३ हजार ६४१ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ केंद्रांवरील ३६ हजार ९४३ क्विंटल असा एकूण ७० हजार ५४८ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे.

हरभरा चुकारे अदा स्थिती

केंद्र...शेतकरी संख्या...हरभरा (क्विंटल)...रक्कम (कोटी रुपये)

मानवत...३०८...४७९२...२.५५६५

बोरी...३०१...४८००...२.५६०८

पाथरी...२०९...३१९०...१.७०२०

पूर्णा...१५५...२२३५...१.१९२६

सेलू....१४०...१६८८...०.९००५

सोनपेठ...१२८...१३४३...०.७१६४

परभणी...३१...५६०...०.३१७९

जिंतूर...००...००...००

हिंगोली...३५४...६५९९...३.५२०५

कळमनुरी...३५५...६५९०...३.५१५७

जवळा बाजार...२८१...४२४७...२.२६६०

कनेरगाव...१८८...३११६...१.६६२३

सेनगाव...२८०...५०१०...२.६७२८

साखरा...५२...७८१...०.४१६६

वसमत...२१...४००...०.२१३६

येळेगाव...००...०००...०००

वारंगा...०००...०००...०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT