Onion Farmer Payment Issue : ‘‘कांदा रोप तयार करायला दोन महिने लागतात. पुन्हा लागवड ते काढणीपर्यंतचे चार महिने आणि आता कांदे विकून पाच महिने झाले, असा कोणता धंदा आहे की त्याला इतका वेळ पैसे मिळण्यासाठी लागतो. केंद्र सरकारने सांगितले होते, ७२ तासांत पैसे मिळतील. मात्र अद्याप पैसे दिले नाहीत. तुमची दिवाळी गोड झाली, आमच्यावर आता ‘संक्रांत’ आणणार का?’’ असा संतप्त सवाल नाफेडकडे पाच महिन्यांपूर्वी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी केला..केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा विक्री केल्यानंतर ७२ तासांत पैसे देण्याचा शब्द होता. मात्र पाच महिने उलटूनही कांदा विक्रीचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.५) थेट नाफेडच्या कार्यालयावर धडक दिली. त्या वेळी शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला होता..Onion Pending Payments: कांदा खरेदीचे थकित पैसे तत्काळ द्या.पैशांच्या मागणीसाठी शेतकरी सोमवारी सकाळी आल्यानंतर सुरुवातीला अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र शेतकऱ्यांचा संयम सुटला. ‘‘तुम्ही कामच करणार नसाल तर कार्यालयाबाहेर चालते व्हा,’’ असे म्हणत अधिकाऱ्यांना बाहेर काढले..अखेर पोलिस यंत्रणेसोबत अधिकारी पुन्हा दुपारी चार वाजेनंतर दाखल झाले. त्या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकार व नाफेडचा गोंधळ उघड केला. या वेळी शाखा व्यवस्थापक बी. एन. पटनाईक यांना शेतकऱ्यांनी घेराव घालून त्यांना धारेवर धरले होते..Farmer Payment Delay: वर्षभरापासून कांद्याचे पैसे थकल्याने ‘एनसीसीएफ’ कार्यालयाला लावले कुलूप .दरम्यान, प्रकरण चिघळत असतानाच पोलिसांनी मध्यस्थी केली. ‘‘आम्ही काबाडकष्ट करून कांदा पिकवला, सरकारला विकला. आज पाच महिने झाले तरी आम्हाला भीक मागितल्यासारखं का वागवलं जातंय? बँकेचे हप्ते आणि उसनवारी फेडायची कशी, असा प्रश्नांचा भडीमार शेतकऱ्यांनी केला. तर पणन कायदा सांगतो, की २४ तासांच्या आत पैसे द्यावेत. मग हा खेळखंडोबा का,’’ असा सवाल नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी शाखा व्यवस्थापकांना केला..केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाचे अधिकारी कांद्याच्या तपासणीसाठी आले तेव्हा सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कळविले का नाही, असा सवाल केल्यानंतर संबंधित शाखा व्यवस्थापकांचा गोंधळ उडाला. नाफेडने शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांना कांद्याची खरेदी करण्यास सांगितली. त्यानुसार ठरल्याप्रमाणे कांद्याची ७२ टक्के रिकव्हरी देखील दिली, मात्र आता शब्द पाळला का नाही? असा सवाल केला..‘राग किती दिवस शांत ठेवायचा? आता विस्फोट होईल’ ‘‘तारीख पे तारीख दिली जात आहे. आमचा राग किती दिवस शांत ठेवायचा. आता विस्फोट होईल. तुम्हाला कारवाई करायची तर शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांवर करा. आम्हाला नाडू नका. मागच्या वेळी जेव्हा आलो, त्या वेळी वेळ मारून नेली. तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा?’’ त्यावर शाखा व्यवस्थापकाने ‘‘तुमचे म्हणणे मी सरकारकडे मांडू शकतो. दुसरे काही करू शकत नाही. सर्व सरकारच्या हातात आहे. जोपर्यंत वरून स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी आपल्याला काय सांगू,’’ अशा शब्दांत हतबलता मांडून संवाद साधण्याचा प्रयत्न केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.