Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : हमीभावाने ६ हजार ५२६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) ने मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हिसीएफ) अंतर्गत ही खरेदी होत आहे.

Team Agrowon

Chana Market Update परभणी ः हमीभाव खरेदी योजने अंतर्गत यंदा हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १६ केंद्रांवर शुक्रवार (ता.२४) पर्यंत २७ हजार २९० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे.

या दोन जिल्ह्यांतील ११ खरेदी केंद्रांवर ३७९ शेतकऱ्यांकडून ६ हजार ५२६ क्विंटल हरभरा (Chana MSP) खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) ने मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हिसीएफ) अंतर्गत ही खरेदी होत आहे.

मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर १५ हजार ७५९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. एकूण ७१० शेतकऱ्यांना संदेश पाठविले. परभणी, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा या ६ केंद्रावर १८२ शेतकऱ्यांकडून ३ हजार २७० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यातील ७ केंद्रांवर १० हजार २५१ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्यापैकी ५८५ शेतकऱ्यांना संदेश पाठविले. कनेरगाव, कळमनुरी, जवळा बाजार, सेनगाव या ४ केंद्रांवर १६९ शेतकऱ्यांकडून २ हजार ६८१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

‘‘शुक्रवारी (ता.२४) अनेक केंद्रांना बारदाना पुरवठा करण्यात आला आहे. आता बारदाना कमी पडणार नाही. आज (ता.२७) खरेदी सुरु होईल, असे जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी सांगितले.’’

‘‘विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील केंद्रावर एकूण १ हजार ७०० शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी १ हजार २७० अर्ज ऑनलाइन आले. २८ शेतकऱ्यांकडून ५७५ क्विंटल हरभरा खरेदी केला,’’ असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

पुरेसा बारदाना उपलब्ध करा

बारदाना नसल्यामुळे अनेक केंद्रांवर उशिरा खरेदी सुरु झाली. काही केंद्रांवरील बारदाना संपल्यामुळे खरेदी बंद ठेवावी लागली. पुरेशा प्रमाणात बारदाना देण्याची मागणी केंद्र चालकांनी केली आहे. काही केंद्रांवर खरेदी सुरु झाली आहे. परंतु लॉट एन्ट्री न केल्यामुळे खरेदीची आकडेवारी दिसत नाही.

केंद्रनिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)

केंद्र...शेतकरी नोंदणी...हरभरा खरेदी...शेतकरी संख्या

परभणी...१५६८...१२०९..६०

जिंतूर...७४६...००...००

बोरी...२२४७...३४०...२१

सेलू...३१०६...२५३...१३

मानवत...२६२७...३६७...२०

पाथरी...२३२५...७००...४७

सोनपेठ...१५२०...००...००

पूर्णा...१६००...४००...२१

हिंगोली...२४०८...००...००

कनेरगाव...८३३...७३६...४५

कळमनुरी...१८३४...४८९...३१

वसमत...१११३...००...००

जवळा बाजार...२८२६...५४७...३९

सेनगाव...१०४५...९०८...५४

साखरा...१९२...००...००

गंगाखेड...१२७०...५७५...२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT