Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी यंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शेतीसाठी प्रोत्साहन, कडबाकुट्टी यंत्र, दूध काढणी यंत्र, आपत्कालीन जानवारे मृत झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासह विविध बाबींवर शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे..जिल्हा परिषदेने मांडलेल्या यंदाच्या (२०२६-२७) अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी १५ लाख रुपये दिले आहेत. संपूर्ण अर्थसंकल्पातून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा जवळपास सहा हजार जणांना लाभ मिळणार आहे..Maharashtra Budget 2026: कंत्राटदारांचा कब्जा असलेला अर्थसंकल्प.अहिल्यानगर जिल्हा परिषदेने यंदाचा (२०२५-२६) अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. १३) मांडला आहे. जिल्हा परिषदेत प्रशासन असल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी हा अर्थसंकल्प माडंला. आनंद भंडारी यांनी नवीन तसेच जुन्या वैयक्तिक लाभाच्या योजना अर्थसंकल्पात कायम ठेवून एआयसारख्या नवीन तंत्रावर या अर्थसंकल्पात भर दिल्याचे दिसते..अर्थसंकल्पात जमा बाजूला २०२५-२६ ला आरंभीची शिल्लक ६९ लाख ९१ हजार ६३६ रुपये असून २०२६-२७ लाख ३ कोटी ३४ लाख ४६ हजार ८३१ ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे महसूल उत्पन्न २०२५-२६ सुरवातीला ४० कोटी ४९ लाख ४२ हजार ६९० होते. ते सुधारितमध्ये ५५ कोटी ६१ लाख ३४ हजार ७१० वर गेले आहे..Relief funds for farmer: अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर; शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार? .२०२६-२७ मध्ये महसुली जमा ४४ कोटी ९४ लाख २८ हजार ५५० गृहीत धरण्यात आले आहे. भांडवली जमा मध्ये २०२५-२६ मध्ये ११ कोटी २६ लाख ५६ हजार १०० निश्चित केले. २०२६-२७ मध्ये देखील एवढीच भांडवली जमा निश्चित केली. जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये कडबा कुट्टी, सायकल वाटप, शिलाई मशिन अशा पारंपरिक योजनांवर भर दिला जातो..शिक्षण, कृषी, समाजकल्याण, ग्रामपंचायत या विभागांवर या अंदाजपत्रकात विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन व अन्य योजनांतून वैयक्तिक लाभाच्या योजना मिळण्यासाठी ४ कोटी १५ लाखांची तरतूद केली आहे. त्यात कृषी विभागासाठी २ कोटी २१ लाख, तर पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी ९६ लाखांची तरतूद केली आहे. यावर्षी दैठणे गुंजाळ, भाळवणी व पारनेरमधील दैठणे गुंजाळ गावांत शेतकऱ्यांच्या दुभत्या गाईंचा मृत्यू झाल्याने नुकसान झाले. अशा बाबींसाठी मदत करण्यासाठी अधिक रक्कम तरतूद केली आहे..शेतीसाठीच्या योजना व रक्कम (लाखांत)स्लरी फिल्टर उपकरण अनुदान ः ४०ड्रोन फवारणी यंत्र अनुदान ः ४९ लाखएआय आधारित ऊस, डाळिंब, केळी तंत्रज्ञान अनुदान ः ९०कडबा कुट्टी यंत्र अनुदान (समाज कल्याण व कृषी) ः ७८मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाणबुडी मोटार अनुदान ः ४२आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत ः १०दूध काढणी यंत्रावर ६० टक्के अनुदान ः २०मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी अनुदान ः १५जनावरे मृत झाल्यास मालकांना भरपाई ः ३०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.