Jalgaon News : खानदेशात गाजावाजा करून काही शासकीय हरभरा खरेदी केंद्र (Chana Procurement Center) सुरू झाले आहेत. परंतु खरेदी रखडत सुरू आहे.
एका केंद्रात रोज फक्त २०० ते २५० क्विंटल एवढ्याच हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. अनेक खरेदी केंद्र बारदानाअभावी सुरू होवू शकलेले नाहीत. (Chana Market Update)
नाफेडअंतगर्त (NAFED) ही खरेदी केली जात असून, जळगाव जिल्ह्यात पारोळा, एरंडोल, रावेर आदी सहा खरेदी केंद्र नुकतेच सुरू झाले. धुळ्यात दोन तर नंदुरबारातही दोन खरेदी केंद्र सुरू झाले आहेत.
परंतु काही खरेदी केंद्रात बारदाना मार्केटिंग फेडरेशनकडून न प्राप्त झाल्याने ते सुरू होवू शकलेले नाहीत. ज्यांच्याकडे मागील वेळेस हरभरा खरेदीसंबंधीचे बारदान शिल्लक होते, त्या केंद्रांनी खरेदी सुरू केली.
परंतु ज्यांच्याकडे बारदाना शिल्लक नव्हता, त्यांनी खरेदी सुरू केलेली नाही. खरेदी सुरू होवू न शकलेल्या केंद्रातील व्यवस्थापनाने हरभऱ्यासाठी भरडधान्याचा बारदाना वापरता येईल का, अशी विचारणा मार्केटिंग फेडरेशनला केली.
परंतु हरभरा खरेदी नाफेडची आहे, त्यासाठी भरडधान्याचा बारदाना वापरू नका, अशी सूचना मार्केटिंग फेडरेशनने केली. यामुळे संबंधित केंद्रांत हरभरा खरेदी सुरू होवू शकलेली नाही.
यामुळे हरभरा खरेदी रखडत सुरू आहे. परंतु मार्केटिंग फेडरेशन लवकरच बारदाना पुरवठा खरेदी केंद्रांना करणार आहे. पुढील आठवड्यात खानदेशातील सर्वच खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.
बारदाना अभावी खानदेशात सुमारे १३ खरेदी केंद्र सुरू होवू शकलेले नाहीत. हे खरेदी केंद्र सुरू करून रोज एका केंद्रात किमान ५०० ते ६०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाजारात देशी, देशी सुधारित हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी म्हणजेच ४२५० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. यामुळे शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणीला प्रतिसाद दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.