Ginger Rate
Ginger Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Market : आले पिकाच्या दरात सात ते आठ हजारांनी घट

विकास जाधव 

Satara News : आले पिकाच्या स्थिर असलेल्या दरात मागील आठवड्यापासून घट सुरू झाली आहे. सध्या आले पिकाच्या खरेदीत प्रतवारी करून प्रतिगाडीस (५०० किलो) ४० हजार रुपये दर मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिगाडी सात ते आठ हजारांनी दरात घट झाली आहे. अचानक दरात घट झाल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यात आले पिकाचे क्षेत्र मोठे असून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगले दर मिळतील या आपक्षेवर या हंगामतही शेतकऱ्यांकडून आले ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे जिल्ह्यात अजूनही आले शिल्लक आहे. मार्चपासून आले पिकाच्या दरात वाढ होत गेली. यामुळे या हंगामात बियाण्याची विक्रमी ५० ते ५२ हजार रुपयांनी प्रतिगाडी खरेदी करून आले लागवड केली आहे.

दरातील समाधानकारकतेमुळे या हंगामात तब्बल ५०० हेक्टर क्षेत्रात वाढ झाल्‍याने जिल्ह्यातील आल्याचे क्षेत्र साडेतीन हजार हेक्टरवर गेल्याचा अंदाज आहे. पुढील काळात दर चांगले राहतील असा अंदाज असतानाच दरात घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे. मागील सप्ताहात प्रतिगाडी ४८ हजार दर मिळत होते, त्यानंतर ते दर ४५ हजार वर गेले होते. सध्या प्रतिगाडी ४० हजार रुपये दर व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहेत.

याचा परिणाम आले खरेदीवर झाल्याचे दिसत आहे. अचानक दरात घट झाल्यामुळे आले सौदे शेतकऱ्यांकडून थांबण्यात आले आहेत. यामुळे आले धुणीच्या ठिकाणची वर्दळ कमी झाली आहे. आले पिकाचे उत्पादन वाढीसाठी खोडवा ठेवला जातो. मात्र शेतकऱ्यांकडून नव्या आल्यास कमी दर किंवा खरेदीच केली जात नाही. फक्त जुन्याच आल्याची खरेदी केली जात असून त्याही आल्यास दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

दरातील घट कृत्रिम

आले पिकाच्या दरात अचानक झालेली घट ही कृत्रिम असल्याची शंका निर्माण झाली आहे. कर्नाटकातून आले पिकाची आवक होत असल्याने दर कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. आले पिकाची नवे-जुने प्रतवारीला शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने व्यापाऱ्यांकडून दर कमी करण्याचा फंडा केल्याचे बोलले जात आहे.

प्रत्यक्षात, कर्नाटकातील आले येण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी आहे. तसेच एकट्या कर्नाटकमुळे दरात इतका फरक पडला जात नाही. यामागे मोठ्या व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. दर कमी करण्याचा व्यापाऱ्यांकडून नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जात असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Controlled Tourism : संवेदनशील क्षेत्रात हवे नियंत्रित पर्यटन

Agriculture Policy : पंतप्रधानांचा शेती क्षेत्राबद्दलचा दावा अन् वास्तव

Agriculture Award : कृषी पुरस्कार निवडीची राज्यभर प्रक्रिया सुरू

Crop Competition : पीक स्पर्धांसाठी अर्ज स्वीकारणी सुरू

Crop Loan : शेतकऱ्यांना ९६ टक्के पीककर्जाचे वितरण

SCROLL FOR NEXT