Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

Tue Rate : विदर्भातील बहूतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या पंधरवाड्यात तूरीने १२ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा पल्ला गाठला होता.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भातील बहूतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या पंधरवाड्यात तूरीने १२ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा पल्ला गाठला होता. त्यानंतर मात्र अमरावती, यवतमाळसह नागपूरच्या कळमना बाजार समितीमध्ये तूरीचे दर दबावात आले आहेत.

सध्या पूर्व विदर्भातील बाजार समित्यांमध्ये तूरीला ११००० ते ११९०० असा दर मिळत आहे. अकोला बाजार समितीमध्ये मात्र हे दर १२ हजार रुपये क्‍विंटलच आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

हंगामाच्या सुरूवातीला तुरीचे दर १० हजार रुपयांवर स्थिरावले होते. मात्र अवकाळी तसेच मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीचा फटका बसल्याने यंदा तुरीची उत्पादकता प्रभावित झाली. परिणामी नव्या हंगामाच्या सुरुवातीला बाजारात आवक वाढती असली तरी त्यानंतर ती कमी होणार हे निश्‍चित होते.

त्यानुसार बाजारात आवक तीन ते चार हजार क्‍विंटलवरुन १७०० क्‍विंटलवर आली. त्याचा दरावरही परिणाम होत ते १२ हजार रुपयांवर पोचले. आता आवक कमी होण्यासह बाजारात दर दबावात आले आहेत. प्रक्रिया उद्योजकांची मागणी कमी झाल्याचे कारण त्यामागे दिले जात असले तरी यापुढील काळात या दरात आणखी तेजीची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सध्या अमरावती बाजार समितीत तुरीला ११००० ते ११८०० रुपये दर आहे. शेगाव बाजर समितीत आवक अवघी ५० क्‍विंटलची तर दर ९००० ते ११३५० रुपयांवर होते. कारंजा (वाशीम) बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी ५०० क्‍विंटल आवक तर दर ९६०० ते ११८०५ असा होता.

या बाजारात सरासरी दर ११२०० मिळाला. यवतमाळ बाजार समितीतही दर दबावात असून १०३०५ ते ११६०० या दराने व्यवहार होत आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत सध्या तूरीची आवक जेमतेम ६९७ क्‍विंटल इतकी आहे. तर ९५०० ते ११८४२ रुपयांचा दर आहे. कळमना बाजार समितीत ८ एप्रिलच्या दरम्यानही तूरीला १२ हजार रुपयांचा दर मिळाला होता.

अकोल्यात १२ हजाराचा दर

अकोला बाजार समितीत तुरीचे दर अजूनही तेजीत आहेत. या बाजारात तूरीची आवक १०८५० क्‍विंटल इतकी असून दर ९००० ते १२०७५ रुपयांवर होता. दर चांगले असल्याने या बाजारात आवक देखील वाढती असल्याचे बाजार सूत्रांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT