Daund News: राहू बेट, खामगाव तसेच पिंपळगाव परिसरात अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १८) तुरळक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मंगळवारी (ता. १९) दिवसभर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या भीज पावसामुळे दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे बळिराजा सुखावला आहे..राहू बेट परिसरात पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पाऊस ऊस, तरकारी पिके, पालेभाज्या, तसेच फळबागांसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आडसाली ऊस लागवडीला, बाजरीच्या पिकाला हा पाऊस अत्यंत पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या बाजरीचे पीक फुलोऱ्यात आहे. काही ठिकाणी बाजरीच्या कणसांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाल्याने हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. डोंगर, माळरानावर जनावरांसाठी चारा उगवण्यास सुरुवात झाली आहे..Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी .मेंढपाळांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. मेंढपाळ मेंढ्यांच्या पालनासाठी डोंगर पायथ्याशी राहू लागले आहेत. सर्वच पिकांची पाने सध्या टवटवीत झालेली आहे. वातावरणामध्ये कधी उकाड्याचे ऊन तर अधून मधून पावसाच्या संततधार सरी कोसळतात. पावसाने दमदार हजेरी लावायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पिकांना चांगले ताजेपणा येऊ लागला आहे..विहिरींची पाणीपातळी वाढणारदौंड तालुक्यात पावसामुळे सध्या तरी शेतातील काही कामे ठप्प आहेत. झालेल्या दमदार आणि भीज पावसामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी पुन्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसामुळे डाळिंब बागांना मोठा फटका बसणार असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकरी सांगत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.