Tur Market : देशभरात तुरीच्या भावाची चढती कमान

Tur Rate : सध्या अनेक बाजारात तुरीचा भाव ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. देशातील परिस्थिती तेजीला पूरक आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

Pune News : सध्या अनेक बाजारात तुरीचा भाव ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. देशातील परिस्थिती तेजीला पूरक आहे. त्यामुळे दरात आणखी ५ ते ७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. पण दुसरीकडे सरकारही तेजीला लगाम घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे दरात चढउतारही राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीच्या भावात मार्च महिन्यात नरमाई आल्यानंतर एप्रिलची सुरवात तेजीने झाली. मागच्या आठवडाभरात तुरीच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मार्चमध्येच तूर १२ हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज होता. पण सरकारचे धोरण आणि इतर कडधान्यांचे भाव नरमल्याचा परिणाम तुरीवर झाला, पण सध्या इतर कडधान्यांचे भावही वाढले आहेत.

Tur Market
Tur Market Rate : मार्च महिन्यात तुरीचा भाव काय राहू शकतो? सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय करतंय?

त्यातच तुरीचा पुरवठा कमी आहे. आयात माल महागच पडत आहे. या कारणाने एप्रिल आणि मे महिन्यात तुरीच्या भावाला चांगला आधार असेल, पण मर्यादित चढ-उतार येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मागील आठवडाभरात तुरीच्या भावात तेजी येण्याचे मुख्य कारण आहे मागणी. देशात सध्या तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यातच मागील महिन्यात तुरीचा भाव काहीसा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली होती.

त्यातच लग्नसराई आणि सणांमुळे मागणी वाढलेली आहे. तसेच म्यानमाररमधून आयात होणाऱ्या तुरीचा भावही वाढला. परिणामी तुरीच्या भावाला चांगला आधार मिळाला आणि भाव वाढले. तुरीचे भाव वाढून शेतकऱ्यांनी विक्री वाढल्यानंतर भावात नरमाई येते आणि भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री कमी केली की टंचाई वाढून पुन्हा तुरीचे भाव वाढतात, असे सध्याचे समीकरण आहे.

तुरीची डाळ बहुतांश बाजारात १७० ते २०० रुपये किलोच्या दरम्यान विकली जात आहे. डाळीचे वाढते भाव पाहून सरकार पुन्हा भाव कमी करण्यासाठी पुढे येऊ शकते. कारण सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

यामुळे तूर बाजाराचे लक्ष सरकारच्या धोरणाकडे कायम आहे. सरकारने एखादा मोठा निर्णय घेतला की तुरीचे भाव पुन्हा काही काळासाठी काहीसे दबावात येऊ शकतात. म्हणजेच भावात चढ उतार येऊ शकतात. याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही अभ्यासकांनी सुचविले आहे.

Tur Market
Tur Market : तुरीचे दर साडेअकरा हजार पार

सरासरी दर ११ हजारांदरम्यान

देशभरातील तुरीच्या बाजारातील सरासरी भावपातळी ११ हजारांच्या दरम्यान दिसते. महाराष्ट्रातील अनेक बाजारात तुरीचा भाव ११ हजार ते १२ हजार रुपये आहे. तर कर्नाटकमधील बाजारात तुरीलाही ११ हजार ते १२ हजारांचा भाव मिळाला. मध्य प्रदेशात १० हजार ते ११ हजार आणि इतर राज्यांमध्येही १० हजारांच्या दरम्यान सरासरी भावपातळी होती. बाजारातील हा भाव तुरीची गुणवत्ता आणि व्हरायटीप्रमाणे मिळत आहे.

दरवाढ अपेक्षित, पण चढ-उताराचाही अंदाज

सध्याचा भाव हंगामातील सर्वाधिक सरासरी भाव आहे. त्यामुळे जे शेतकरी १२ हजारांच्या अपेक्षेने माल ठेऊन होते, त्यांनी काही माल विकायला हरकत नाही. मे महिन्यापर्यंत तुरीच्या भावात आणखी ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.

पण बाजारात चढ-उतार राहण्याचा अंदाज आहे. कारण भाव वाढल्यानंतर सरकार लगेच बाजारात हस्तक्षेप करते, हा आपला आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे बाजारातील दराचा आढावा घेऊनच शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

देशातील उत्पादन घटल्याने सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. तसेच म्यानमारमधून आयात झालेल्या तुरीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे देशातील बाजारभावही वाढले आहेत.
- राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्लेषक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com