Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळी दरावर दबाव

Banana Rate : खानदेशात केळी दरांवर मागील सात ते आठ दिवसांत सतत दबाव वाढला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळी दरांवर मागील सात ते आठ दिवसांत सतत दबाव वाढला आहे. आवकेत मोठी वाढ मागील पंधरवड्यात झाली असून, हंगामी फळांमुळे केळीस उठाव कमी असल्याची माहिती मिळाली आहे. दर्जेदार किंवा काश्मीर, उत्तरेकडील मॉल्समध्ये पाठवणुकीच्या केळीचे दर मागील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

त्यात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची घसरण झाली. सध्या उत्तरेकडे व काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर प्रतिक्विंटल १२०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सध्या बाजारात आंबा, चिकू, कलिंगड आदी फळांची रेलचेल आहे. परिणामी, केळीस उठाव कमी झाला आहे. यातच केळीची आवकही वाढली आहे.

सध्या खानदेशात रोज ३६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगरात मिळून रोज २९० ट्रकपेक्षा अधिकची केळी आवक होत आहे. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांतही केळीची आवक चांगली आहे. जळगावातील चोपडा, जामनेर, जळगाव, पाचोरा-भडगाव भागांत केळीची आवक कमी आहे.

कमी दर्जाच्या केळीचे दर ७००, ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मध्यम दर्जाच्या केळीस १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. सध्या मध्य प्रदेश, गुजरामधूनही केळीची पाठवणूक उत्तरेकडे सुरू आहे. यामुळे बाजारात केळीसंबंधीची मोठी मागणी तयार होत नसल्याची स्थिती आहे. खानदेशातून सध्या उत्तरेसह राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, तसेच छत्तीसगड, राजस्थानातही केळीची पाठवणूक सुरू आहे

बऱ्हाणपुरातही आवक अधिक

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक वाढली आहे. तेथे रोज १८० ते २०० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही दर कमी असून, कमाल दर १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. बऱ्हाणपुरात खानदेशातील रावेर, मुक्ताईनगरातून केळीची पाठवणूक काही एजंट करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT