Masoor  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Masoor Rate : मसूरच्या दरात सुधारणेचा अंदाज

Masoor Market Rate : भारतात तुरीला पर्याय म्हणून काही भागांमध्ये मसूरला पसंती दिली जाते. त्यामुळे तुरीच्या बाजारासाठी मसूरचे दर महत्त्वाचे आहेत. पण यंदा देशात मसूरचे उत्पादनही मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

अनिल जाधव

Pune News : भारतात तुरीला पर्याय म्हणून काही भागांमध्ये मसूरला पसंती दिली जाते. त्यामुळे तुरीच्या बाजारासाठी मसूरचे दर महत्त्वाचे आहेत. पण यंदा देशात मसूरचे उत्पादनही मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे मसूरची गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे मसूरच्या दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सध्या मसूरला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे.

देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे आयात करूनही गरज पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी विविध उपायांची चाचपणी करत आहे.

तर देशातील काही भागांमध्ये तुरीला पर्याय म्हणून मसूरचा वापर होऊ शकतो. असा तो होताना दिसतो. यंदा देशात मसूरचे उत्पादन वाढल्याचा दावा सरकारने केला.

मागील हंगामात देशात जवळपास १३ लाख टन मसूरचे उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादन १६ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला.

यंदा आयात कमी राहण्या अंदाज

सरकारने यंदा देशातील उत्पादन ३ लाख टनांनी वाढल्याचे म्हटले आहे. पण शेतकऱ्यांच्या मते यंदा उत्पादनात वाढ झाली नाही. तर पिकाला अनेक भागांत फटका बसला होता. देशात वर्षाला २२ लाख टन मसूरचा वापर होतो.

त्यामुळे यंदाही सरकारला आयात करावी लागणार आहे. भारत दरवर्षी मसूरची मोठ्या प्रमाणात आयात करतो. गेल्या हंगामात विक्रमी ८ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान आयात झाली होती. तर यंदा आयात ७ लाख टनांवरच स्थिरावेल असा अंदाज आहे.

बाजार नरमण्याची शक्यता कमीच

यंदा भारताची आयात वाढणार असल्याचा फायदा कॅनाडाला होऊ शकतो. यंदा कॅनडाची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे कॅनडात मसूरचा शिल्लक साठा कमी राहील. तर ऑस्ट्रेलियात उत्पादन घटल्याने निर्यातही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मसूरचा बाजार जास्त नरमण्याची शक्यता कमीच आहे, असे बाजार विश्लेषक सांगत आहेत.

तूर, उडीद, मुगाच्या दरातही सुधारणा

केंद्र सकारने यंदा मसूरला ६ हजार रुपयांचा हमीभाव जाहीर केला. सध्या मसूर आवकेचा हंगाम असूनही दर हमीभावाच्या दरम्यान आहेत. सध्या मसूरला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ८०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

तूर, उडीद आणि मुगाचे भाव तेजीत असल्याने पुढील काळात मसूरलाही आधार मिळण्याची शक्यता आहे. मसूरचे दर वाढल्यास तुरीच्या दरातील तेजी आणखी वाढण्यास मदत होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT